जल, जमीन व जंगल जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे नैसर्गिक स्रोत धोक्यात आले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी समाजात जागृती होणे आवश्यक आहे. आज जमीन स्वत:च्या कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून विकत घेण्याचे कपट-कारस्थान बडे भांडवलदार मंडळी करीत आहे. जंगलाचे संपूर्ण व्यवस्थापन धोक्यात आले आहे व जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलेले जल आज पिण्यासाठीसुद्धा मिळेनासे झाले आहे. स्वातंत्र्याच्या या ६८ वर्षांत एक ग्लास स्वच्छ पाणी सामान्य माणसाला न मिळणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. प्रशासन या बाबतीत काही धोरणे आखत आहे. सद्यकाळात गावागावांत स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम योजना असे कार्यक्रम राबवीत आहे. पण या योजनांमध्ये जनमानसाचा सहभाग असणे आवश्यक आहे. ग्रामीण नागरिक या मूलभूत समस्येकडे जागृत अवस्थेत बघेल तेव्हा हे अभियान यशस्वी होईल.

सिंगापूरसारखा देश समुद्राचे खारे पाणी गोड करून ते पाणी पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करीत आहे. इस्रायलसारखा देश शेती करीत असताना, त्या देशात नैसर्गिक साधनसामुग्रीची विपुलता नसूनसुद्धा, शेतीतील झाडाच्या फक्त खोडांना मोजूनमापून पाणी देऊन जगवीत आहे. वरील देशातील उपाययोजना आपल्या देशात उपयोगात आणता येईल काय? आपल्या देशात पाण्याच्या पूर्ण वापराच्या बाबतीत घरगुती सांडपाण्याच्या भरवशावर काही भाजीपाला, फुलविण्याचा प्रयत्न सातारा जिल्ह्यतील आसगांव येथे झाला. म्हणजे फक्त परसबाग फुलविण्याचे काम सांडपाण्यावर करायचे एवढा विचार पाण्याच्या पूर्ण वापराच्या बाबतीत आपल्या देशात आता झाला. समुद्राच्या खाऱ्या पाण्याला गोड करून याचा पुनर्वापर करायचा विचार सध्या तरी आपल्या देशात नाही. पण आपण हे लक्षात घ्यायचे की, आपल्याजवळ माणसे आहेत. येणारे हे संकट परतवण्याची क्षमता आपल्या माणसांमध्ये आहे. त्यासाठी साधा आणि सोपा उपाय म्हणजे देशातील जनतेने पाण्याचा योग्य वापर करणे व त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यामध्ये योग्य ती जागृती घडवून आणणे. आपण अनेक संकटे लोकांच्या मनपरिवर्तनातून परतवली आहेत. या चंगळवादी उपभोगग्रस्त संस्कृतीने निर्माण केलेले हे संकट आपण जनतेच्या मनपरिवर्तनातून परतवू शकतो. कारण आपला संपूर्ण भरवसा लोकशाहीवर आहे. म्हणून लोकांच्या भरवशावरच आपण पाणी बचतीचे व स्वच्छतेचे प्रयोग यशस्वी करू शकतो हा भरवसा आपण बाळगावा.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?

भौतिक सोयी-सुविधांच्या नावाखाली अतिरेकी वापर करून आपल्याकडे पाण्याचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर केला जातो. वाहत्या नळाखाली कपडे धुणे, शॉवरखाली आंघोळ करणे, वाहत्या पाइपद्वारे गाडी धुणे, शौचालयासाठी स्टायलिश फ्लॅशचा वापर करणे यामधून पाण्याची किमान तीनपट नासाडी होते. पुढील तक्त्यावरून हे आपल्याला सहज लक्षात येईल.

या प्रकारातील दुसरेसुद्धा उदाहरण बघता येईल ते असे मुंबई शहराला दररोज २९०० (मिलियन लिटर्स पर डे) पाणी लागते. प्रत्येकाने दररोज ५० लिटर पाणी वाचविले. १ कोटी २० लाख मुंबईकरांना मिळून दररोज ६० कोटी लिटर म्हणजे सुमारे ६०० टछऊ (मिलियन लिटर्स पर डे) पाणी वाचू शकते. म्हणजे ५ दिवस पाणी बचत केली तर वाचलेल्या पाण्यावर मुंबईकरांचा सहावा दिवस निघू शकतो. म्हणूनच शहरी विभागातील हा पाणी वापराचा अतिरेक टाळण्यासाठी योग्य ती जनजागृती  करणे आवश्यक आहे. पृथ्वीचा ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. पण यातील सुमारे ९० टक्के पाणी बर्फाच्या रूपात आहे. फक्त १० टक्के इतकेच पाणी मानवजातीला उपयोग करता येईल असे आहे. म्हणूनच पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. तो वाचविला पाहिजे, त्याची बचत केली पाहिजे.

पाणी समस्येतूनच आरोग्याची समस्या निर्माण होते. त्यासाठी परिसराची व पाण्याची स्वच्छता आवश्यक आहे. पण मोठमोठय़ा कारखान्यांतील दूषित पाणी बिनधास्तपणे नदीनाल्यामध्ये सोडून त्यातून पाण्याचे स्रोत दूषित करणे सुरू आहे. त्यातून समाजात भरपूर प्रमाणात आजार पसरत आहेत. यापेक्षा अधिक महत्त्वाचे सांगायचे म्हणजे ग्रामीण विभागात अजूनही शौचालयास बाहेर जाण्याची पद्धत आहे. उघडय़ावर शौचास बसल्यामुळे जलप्रदूषण होते. मानवी विष्ठा उघडय़ावर टाकल्यामुळे ती वाहत्या पाण्याबाहेर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात मिसळते. यासाठी गोदरीमुक्त (हागणदारीमुक्त) महाराष्ट्र करण्यासाठी कार्यक्रम राबविणे हे शासनाचे अभियान सुरू आहे. पल्स पोलिओ, विविध रोगांचे लसीकरण व आरोग्य शिबिरे, जलस्रोताचे सार्वजनिक परिसराचे र्निजतुकीकरण या सर्व योजनांवर शासनाचे या अभियानांतर्गत करोडो रुपये खर्च होत आहेत. उघडण्यावर शौचास बसल्यामुळे मानवी विष्ठा पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात जाऊन मिसळते. त्यामुळे डायरिया, कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रायसिस, उलटय़ा, जुलाब, कावीळ असे आजार होतात. दूषित पाण्यात डासांची पैदास होते. व त्यातून हिवताप, डेंग्यू होतात.

सण, उत्सव, अथवा मेळावे हे आपल्या देशातील आनंदाचे क्षण. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याकडे मोठमोठय़ा यात्रा भरतात, अनेक लोक अशा ठिकाणी एकत्र येतात. इतक्या साऱ्या लोकांची बडदास्त बरोबर होऊ शकत नाही, त्यामुळे हे लोक उघडय़ावर शौचास बसतात. त्यांची विष्ठा नदीच्या पाण्यात पावसाद्वारे मिसळते व त्यातून मोठमोठे आजार  पसरतात. १९५७ साली दिल्ली येथे काविळीची मोठी साथ पसरली होती. त्याचे कारण नदीच्या पाण्यात मानवी विष्ठा व मूत्राचे प्रमाण फार मोठय़ा प्रमाणात मिसळले होते. व त्यातून हजारो लोक मृत्युमुखी पडले.

21-lp-chart

विहीर, नदी, नाले, तलाव, कूपनलिका हे पाण्याचे स्रोत दूषित होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवी. या कार्यक्रमात शासनाबरोबर नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यतील एका गावात गोदरीमुक्त गाव करण्यासाठी काही कर्मचारी लोकांच्या (डय़ुटी) पाळ्या लावल्या होत्या. गावातील कुणीही शौचास सकाळी उघडय़ावर बसले, तर शिट्टी वाजविणे व इतरांना बोलाविणे, अथवा कोणताही गावातील कर्मचारी गावात उघडय़ावर शौचास बसलेला आढळला, तर त्याच्याकडे सर्वानी जाऊन चहा-पान करणे, पण हे उपाय म्हणजे जखम पायाला व पट्टी डोक्याला असे आहेत.

विहिरी, नदी, नाले, तलाव कूपनलिका हे पाण्याचे स्रोत दूषित का होतात? आपल्या खोडसाळ व अभद्र वागणुकीने नदीमध्ये जनावरे धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, विहिरीत कचरा टाकणे, विहिरीजवळ सांडपाणी साठवून ठेवणे, नळाची पाइप लाइन गळत असल्यास शासनास न कळविणे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने न लावणे, कूपनलिकेचा पाया भ्रष्टाचार करून बरोबर न करणे, इ. हे सर्व योग्य पद्धतीने होण्यासाठी जागृत व संस्कारित नागरिकांची आवश्यकता आहे. याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक घराघरात आवश्यक आहे.

धुळे जिल्ह्यत ‘शिरपूर’ गाव सातपुडय़ाच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्यांच्या  दक्षिण दिशेला तापी नदी आहे. शिरपूर हा आदिवासी तालुका आहे. आपण बाहेर १०/१२ रुपयाला  शुद्ध पाण्याची बाटली विकत घेतो, त्याच दर्जाचे पाणी शिरपूरवासीयांना नळाद्वारे मिळत आहे. अशा प्रकल्पांची  आज सर्वच गावांना गरज आहे.
प्रा. विजय वाघमारे – response.lokprabha@expressindia.com