19 September 2019

News Flash

डेव्हिल्स स्पॅगेटी

साहित्य : २५० ग्राम स्पॅगेटी, १ टी स्पून रेड चिली फ्लेक्स, ३ लसूण पाकळ्या बारीक चिरून

साहित्य : २५० ग्राम स्पॅगेटी, १ टी स्पून रेड चिली फ्लेक्स, ३ लसूण पाकळ्या बारीक चिरून, २ टी स्पून चिरलेले सन ड्राइड टोमॅटो, ४-५ टी स्पून ऑलिव्ह ऑइल, पार्माझान चीज आवडीप्रमाणे.

noodlesकृती : प्रथम स्पॅगेटी पाकिटावरील सूचनेप्रमाणे मीठ घालून शिजवून घ्यावी. मग एका भांडय़ात ४ टी स्पून ऑलिव्ह ऑइल टाकावे. थोडेसे गरम झाले की, त्यात लसूण परतून घ्यावा. मग त्यात सन ड्राइड टोमॅटो व रेड चिली फ्लेक्स टाकून एकत्र करून घ्यावे. मग त्यात शिजलेली स्पॅगेटी घालावी. सगळे नीट एकत्र करून गॅस बंद करावा. वरून आवडीप्रमाणे पार्माझान चीज घालावे व सव्‍‌र्ह करावे. स्पॅगेटी थोडी कोरडी वाटली तर १-२ चमचे ऑलिव्ह ऑइल अजून घालावे. यात रेड चिली फ्लेक्स आणि लसूण आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येईल.

पास्ता सलाड

food02साहित्य : २५० ग्राम शिजवलेला पास्ता, अर्धा वाटी शिजवलेले मटार, १ रंगीत कॅप्सिकम बारीक तुकडे करून, मीठ, मिरपूड, १ मोठा चमचा केचप, ३ मोठे चमचे मेयॉनीज.

कृती : मेयॉनीज आवडीप्रमाणे जास्त घालता येईल. हे सर्व नीट मिक्स करणे आणि फ्रिजमध्ये ३ तास गार करावयाला ठेवणे.
अनघा दातार, जर्मनी – response.lokprabha@expressindia.com

First Published on October 9, 2015 1:13 am

Web Title: food recipes vachak chef 2