lp35lp39साहित्य : दोन वाटय़ा तांदूळ, एक वाटी उडदाच्या डाळीचा सोला,
एक टी-स्पून जिरं, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चिमूटभर हिंग, आवडीनुसार लोणी व चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम तांदूळ आणि सोला वेगवेगळय़ा पातेल्यांत रात्रभर भिजायला ठेवावा. सकाळी तांदूळ व सोला एकत्रित वाटून घ्यावा. वाटताना थोडे थोडे पाणी घालावे. वाटून झाल्यावर त्या मिश्रणात मीठ घालावे व हे मिश्रण उबदार ठिकाणी ठेवावे, जेणेकरून हे मिश्रण फुलून येईल.
त्यानंतर त्यात जिरं व हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत व ते मिश्रण डावेने चांगले हलवून घ्यावे. हे मिश्रण भिजवावे. डोशाच्या पिठाप्रमाणे.
फ्राय पॅनवर लोणी गरम करून डोशाप्रमाणेच उत्तपमचे घोळण तव्यावर सोडावे. फक्त ह्य मिश्रणाचा जाड थर द्यावा. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. तयार गरम उत्तपमवर मसाल्याची भाजी घालावी. डोशाची भाजी डोशाप्रमाणेच.

lp37आलू मटार कटलेट
साहित्य : चार-पाच उकडलेले बटाटे, वाटाणे वाफवलेले १ वाटी, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, कोथिंबीर दोन चमचे चिरलेली, १ चमचा ब्रेड क्रम्स, एक टीस्पून ओवा. जिरं, गरम मसाला व चाट मसाला चवीनुसार मीठ व तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम बटाटे किसणीच्या मदतीने किसून घ्यावेत. त्यात वाफवलेले ओले वाटाणे कुस्करून घालावे. त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ब्रेड, क्रम्स, ओवा, जिरं, गरम मसाला, चाट मसाला व मीठ घालून हे मिश्रण कालवून घ्यावे. तयार मिश्रणाचे गोल किंवा अंडाकृती वडे तयार करावेत व हे गोल वडे कढईमधील कडक गरम तेलातून खमंग तळून घ्यावेत.
हिरव्या चटणीबरोबर ह्यची लज्जत काही औरच असते.


लिंबू-मिरची लोणचे

साहित्य : ६ ते ७ लिंबांचा रस, अर्धा किलो मिरच्या, मोहरीची डाळ, हिंग, मेथ्या, (१ टे. स्पून) पूड, मीठ फोडणीसाठी- तेल (अर्धा वाटी) मोहरी, हिंग, हळद.
कृती : मिरच्या धुऊन, स्वच्छ पुसून घ्याव्यात व त्यांचे बारीक तुकडे (अंदाजे १ सें. मी.) करून घ्यावेत. त्यामध्ये मोहरीची डाळ, मीठ, हिंग, मेथ्याची घालावी. त्यानंतर लिंबांचा रस घालून सर्व मिश्रण नीट कालवून घ्यावे. फोडणी करून ती थंड होऊ द्यावी व त्यातील थोडी बाजूला काढून ठेवावी. उरलेली फोडणी वरील मिश्रणामध्ये मिसळून सर्व नीट कालवून घ्यावे. एका कोरडय़ा, स्वच्छ बरणीमध्ये मिश्रण भरून घ्यावे व शिल्लक फोडणी वरून घालावी. हे लोणचे वर्षभर सहजपणे टिकते.

कैरी-मिरची लोणचे
साहित्य : मध्यम आकाराच्या ५ कैऱ्या, हिरव्या मिरच्या अर्धा किलो,
आलं ५० ग्रॅ. मीठ, मोहरीची डाळ हिंग, मेथ्या. फोडणीसाठी – तेल (एक वाटी), मोहरी, हिंग, हळद.
कृती : कैऱ्या व मिरच्या धुऊन स्वच्छ पुसून घ्याव्यात. आल्याचे साल काढून किसून घ्यावे. कैऱ्याही किसून घ्याव्यात. मिरच्यांचे बारीक तुकडे (अंदाजे १ सें.मी.) करून घ्यावेत. मिरच्यांचे तुकडे, आलं व कैरीचा कीस व मीठ एकत्र करून कालवून घ्यावे. फोडणी करून ती गार होऊ द्यावी. त्यातील काही फोडणी (अंदाजे अर्धा माग) बाजूला काढावी. उरलेली फोडणी वरील मिश्रणामध्ये घालावी व मिसळून घ्यावी. ऐका कोरडय़ा स्वच्छ बरणीमध्ये सर्व मिश्रण भरावे व त्यावर बाजूला काढून ठेवलेली फोडणी घालावी. झाले तयार कैरी-मिरची लोणचे! हे वर्षभर टिकते.

lp38ब्रेड पकोडा (भजी)
साहित्य : चार ब्रेडच्या स्लाइस, एक वाटी बेसन, एक छोटा टेबल स्पून, मिरची पावडर व धने पावडर, एक एक टी स्पून ओवा, जिरं, तीळ, हिरवी कोथिंबीर, चिमूटभर खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ व तळण्यापुरते तेल.
कृती : प्रथम ब्रेडच्या स्लाइस त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात कापून घ्याव्यात म्हणजे एका स्लाइसच्या चार चौकोनी तुकडे होतील.
त्यानंतर एका पातेल्यात बेसन, मिरची पावडर, धनेपूड, ओवा, जिरं, तीळ, खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर, हिरवी कोथिंबीर व चवीनुसार मीठ एकत्रित करावे व त्यानंतर ह्य मिश्रणाला कडक, गरम एक टेबलस्पून तेलाचे मोहन घालावे, मिश्रण पाण्याने व्यवस्थित भिजवावे. खूप पातळ ही नको आणि फार घट्टही नको.
ह्य तयार मिश्रणात ब्रेडचा एक एक तुकडा बुडवून गरम तेलात तळून काढावा. हे तयार ब्रेडचे पकोडे चिंचेच्या सॉसबरोबर खाण्यात फारच चविष्ट वाटतात.
चारुता परांजपे – response.lokprabha@expressindia.com