18 September 2019

News Flash

गोड टॉमेटो भात

साहित्य : १ वाटी बासमती तुकडा तांदूळ, दीड वाटी टॉमेटो प्युरे, १ वाटी साखर, अर्धा वाटी साजूक तूप

साहित्य : १ वाटी बासमती तुकडा तांदूळ, दीड वाटी टॉमेटो प्युरे, १ वाटी साखर, अर्धा वाटी साजूक तूप, १ चमचा लवंग पूड, १ चमचा दालचिनी पूड, २ ते ३ वेलदोडे, १ चमचा केसर-वेलची सिरप, १ वाटी गरम पाणी, चिमूटभर मीठ.

कृती : प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवावेत. पातेल्यात तूप गरम करून वेलदोडे घालावेत. त्यात तांदूळ घालून चांगले परतून घ्यावेत. त्यात कढत पाणी घालून, ढवळून झाकण ठेवावे आणि भात शिजू द्यावा. भातातले पाणी जिरले की त्यात टॉमेटो प्युरे, साखर आणि चिमूटभर मीठ आणि केशर-वेलची सिरप घालून ढवळावे.

कुकरमधून एक शिटी काढून भात शिजवून घ्यावा, त्यातून वाफ गेल्यावर बाहेर काढावा. ४-५ तास मुरल्यानंतर पुन्हा गरम केल्यावर जास्त चांगला लागतो. सव्‍‌र्ह करताना काजू-बदाम वरून घालावे, वाटल्यास संत्र्याच्या फोडीही घालाव्यात.

मीता बेंद्रे – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 4, 2015 1:26 am

Web Title: recipes 19