साहित्य : २ वाटी मैदा, २ वाटी बारीक रवा, २ वाटी तूप, १/२ वाटी दूध, २ वाटी बारीक साखर, वेलची पावडर.

कृती : रवा आणि मैदा चाळणीने चाळून एकत्र करावा. आता २-३ चमचे गरम तूप आणि दुधाचे मोहन घालून एकत्र करून ५-६ तास किंवा रात्रभर तसाच झाकून ठेवावा.

दुसऱ्या दिवशी हे मिश्रण बारीक चाळणीवर चाळून घ्यावे. यालाच कणी पाडणे म्हणतात. कढईत तूप घालून गरम झाल्यावर चाळलेला रवा-मैदा तूप सुटेपर्यंत चांगला गुलाबीसर रंगावर भाजावा. थंड झाल्यावर हाताने चांगला बारीक करावा. त्यामध्ये बारीक बारीक गोळे नसावे. नंतर बारीक साखर, वेलची पावडर घालून एकत्र करावा. हा लाडू असाच ठेवतात. वेळेवर लाडू वळवून खाण्यास द्यावे.

मोदकपात्रात घालून मोदकाचा आकार देऊन गणपतीला नैवेद्य दाखवू शकतात.

टीप : दुधामुळे बारीक गोळे होतात, त्यामुळे कणी पाडताना चाळणीवरचा जाडसर रवा मिक्सरवर बारीक करून भाजण्यास घ्यावा.

राजश्री नवलाखे – response.lokprabha@expressindia.com