14 August 2020

News Flash

विरहाच्या भावना मनाला भिडणाऱ्या

ऊर्मिला मुरके यांचे ११ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेले ‘मनातलं कागदावर’ अतिशय सुंदररीत्या उतरवलं आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ऊर्मिला मुरके यांचे ११ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेले ‘मनातलं कागदावर’ अतिशय सुंदररीत्या उतरवलं आहे. त्यातील गद्य व संवाद दोन्ही भाग अतिशय उत्कृष्ट झाले आहेत. तीनही प्रसंग उत्तमरीत्या साकारले आहेत. त्यांची लेखनशैली मनाला भावणारी आहे. पहिली लहान मुलगी मनू आणि तिचे आजोबा यांची गोष्ट मन हेलावून जाते. बाल, तरुण आणि वृद्ध तिघांच्या मनातील विरहाच्या भावना मनाला भिडणाऱ्या आहेत. अतिशय सुंदर लिखाण वाचल्यावर मिळणारे समाधान आणि आनंद त्यांच्या ‘चिंब पाऊस’ने दिले.   – श्रीकांत भगवते

 

ताण हलका झाला

‘तूच तुझा परीक्षक’ हा धनश्री लेले यांचा ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचून आनंद झाला. स्वानंद प्राप्त झाला. डोक्यावरचा ताण हलका झाला. अनेक मानसशास्त्रीय लेख वाचनात आले. पण हा विषय तसा प्रत्येकाच्या बाबतीत घडणारा, तरी पण वाचनात कधी आला नव्हता. कधी कधी काही निर्णय हे मोठय़ा माणसांच्या हातात असतात. जसे आई, वडील, मोठे भाऊ, बहीण, इतर वडीलधारी मंडळी, वरिष्ठ मंडळी. कधी कधी आपल्या पूर्वीच्या वागण्याचा, प्रगतीचा परिणाम या मंडळींच्या निर्णयावर होत असतो. जो निर्णय आपल्याला मान्य नसतो. नुकसानही संभवत असते. अशा वेळी आपला मुद्दा पटवून देणे हितावह ठरत असते.  – हेमंत पराडकर, मुंबई.

 

सत्य परिस्थितीचे कथन

‘एका तृतीयपंथीयाचं सरपंच होणं’ हा एजाज हुसेन मुजावर यांचा २८ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेला लेख वाचला. ‘चतुरंग’ने वाचकांना घरी बसल्या बसल्या सोलापूर जिल्ह्य़ातील तरंगफळ येथील वृत्त अतिशय उत्कृष्टपणे दिले. त्यात माऊली कांबळे यांच्या कुटुंबाची, इत्थंभूत सर्व माहिती दिली. बालपणापासून ते सरपंचापर्यंत. आज समाजात त्यांना यामुळे मान मिळणार. जनतेची कामे करणारे, अत्यंत धार्मिक पद्धतीने जीवन जगणारे हे लोक आहेत. भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार. अतिशय अभ्यासपूर्ण सत्य माहितीही जनतेसमोर मांडली. लोकांनी तृतीयपंथीयांबद्दलचा गैरसमज दूर केला पाहिजे.

‘अनुभव – सूक्ष्म आणि व्यापकही’ हे कॉ. मुक्ता मनोहर यांचे ‘कार्यकर्त्यांच्या नजरेतून’ हे सदर म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचे सत्य परिस्थिती अन् अनेक स्त्रियांचे एकत्रीकरण संघटन हे फार अवघड कार्य आहे; परंतु जिद्दीने, नेटाने कॉ. अप्पासाहेब भोसले यांच्याबरोबरीने काम करणाऱ्या मुक्ता मनोहर यांना शतश: धन्यवाद!      – सुहास मुंगळे मास्तर, विठ्ठलवाडी, पुणे.

 

नावीन्यपूर्ण, माहितीने परिपूर्ण लेख

नेहमीप्रमाणे ११ नोव्हेंबरची पुरवणीही वाचनीय व विविध विषय, नावीन्यपूर्ण व सखोल माहितीने परिपूर्ण होती. यातील ‘वार्धक्यरंग’ या सदरातील भा. ल. महाबळ यांचा संगीतसेवक, संगीता बनगीनवार यांचा ‘नात्याच्या पलीकडे’ हे लेख हृदयस्पर्शी होते. ‘शहरातून गावाकडे’ हा चेतना सिन्हा यांचा प्रवास छान अनुभव देऊन जातो. बातमीदाराच्या चुकीमुळे गुरवऐवजी सिन्हा असे आडनाव या पतीपत्नीचे होते हे अचंबित करणारे होते. ‘लगोरी’तून चित्रा पालेकरांचे व्यक्तिमत्त्व व त्यांचा कलाप्रवास उलगडून पाहावयास मिळतो.    – मिलिंद भिडे, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2017 4:52 am

Web Title: loksatta reader response on chaturang articles 3
Next Stories
1 इच्छामरण हे वरदानच!
2 आयन रँडवरचा लेख उत्तम
3 तर हेफनरचा प्रामाणिकपणा उठून दिसला असता
Just Now!
X