05-lp-cvrमी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. आपला कार्टून विशेषांक पाहून खूप आश्चर्य वाटले. आंजल अफगाण आणि चैताली जोशी यांचे लेख आवडले.

मला अ‍ॅनिमे प्रचंड आवडते. आजवर मी अ‍ॅनिमेच्या किमान १०० सीरिज पाहिल्या आहेत. पण महाराष्ट्रात मला माझ्यासारखे अ‍ॅनिमेचं वेड असणारं कोणी भेटले नाही. अ‍ॅनिमे, कार्टून आणि इलेस्ट्रेटेड कॅरेक्टर्स यांच्यातला नेमका फरक लोकांना कळत नाही. अ‍ॅनिमे म्हणजेच कार्टून असं जेव्हा संबोधलं जातं तेव्हा खरंच वाईट वाटतं. ‘लोकप्रभा’च्या कार्टून विशेषांकामुळे त्यांचा हा गैरसमज दूर होऊ शकेल, असं वाटलं. अंजल अफगाण यांनी अ‍ॅनिमे आणि त्यांच्या शैलीबद्दल लिहिलेला स्पष्टीकरणात्मक लेख आवडला.

loksatta satire article on arvind kejriwal mango eating controversy
उलटा चष्मा : पुन्हा आंबापुराण
the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

अ‍ॅनिमे हा खूप मोठा विषय आहे.  अ‍ॅनिमे ओएसटी, ओपनिंग अ‍ॅण्ड एण्डिग थीम्स, त्यासाठीचे विशिष्ट आवाज देणारे कलाकार (२ी्र८४४), ग्राफिक्स, त्यावर आधारित उत्पादने असे बरेच घटक त्यात येतात. अ‍ॅनिमेचे ग्राफिक्स हे इतर ग्राफिक्सपेक्षा वेगळे आणि उत्तम असतात. त्यात बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अ‍ॅनिमेबद्दल ही सारी माहिती माझ्याकडे आहे, याचा मला आनंद आहे.
– किरण कांदेकर, ई-मेलवरून

बालपणात नेणारा अंक
‘लोकप्रभा’चा काटरून विशेषांक पाहूनच खूप आनंद झाला. प्रत्येक लेख वाचताना बालपणाची आठवण येत होती. पुन्हा एकदा बालपणात घेऊन गेल्याबद्दल आपले आभार.
– अनंत काळे, औरंगाबाद</strong>

जपून ठेवायचा अंक
कार्टून विशेषांक हा खूप चांगला आहे. आमच्या घरी तो रद्दीत न टाकणे असे सर्वानुमते ठरले. शेवटची कथापण उत्तम. ‘लोकप्रभा’च्या चमूचे अभिनंदन.
– म. ना. देशपांडे

06-lp-cvrई-पुस्तकात लेखकांच्या स्वामित्व हक्कावर गदा
४ मार्चच्या अंकातील सुहास जोशी आणि अनिल शाळीग्राम यांचे ई-पुस्तकांवरील लेख वाचले. मराठी ई-पुस्तकांची प्रगती वाचून आनंद झाला. एक लेखक या नात्याने माझा अनुभव सांगू इच्छितो. २००८ ते २०१४ च्या दरम्यान मी तीन पुस्तके इंग्रजीत लिहिली आणि ती एकाच प्रकाशकाने छापली. पुस्तकांचे कॉपीराइट माझ्याकडेच होते, आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत असे आढळून आले की, माझी पुस्तके काही वेबसाइट्सवर ई-पुस्तके आणि फ्री डाऊनलोड या प्रकारे उपलब्ध आहेत. प्रकाशकाशी संपर्क साधला असता त्याला यासंबंधी काही माहिती नव्हती. वेबसाइटवर ज्यांनी जाहिरात केली त्यांनी कुणीही मला विचारले नव्हते, परवानगी तर दूरच. ई-पुस्तक रूपांतर करताना लेखकाच्या कॉपीराईटचे काय होते? पुस्तकाच्या विक्रीवर त्याला मिळणाऱ्या स्वामित्व रक्कमेचं काय? ई-पुस्तकांबद्दल माझी काही तक्रार नाही, पण त्यामुळे लेखकांचे अधिकार आणि त्यांना मिळणारी स्वामित्व रक्कम डावलली जाऊ नये.

वर्धापन दिन विशेषांकातील महाभारत केव्हा घडले असेल याविषयीचे त्या विषयातील तज्ज्ञांनी लिहिलेले दोन अतिशय उद्बोधक लेख वाचायला मिळाले. ज्ञानात खूप भर पडली. याच अंकात उमेश कामत आणि प्रिया बापट यांची मुलाखत वाचली, करमणूक झाली. महाभारतावरील लेखांना आठ पाने आणि तितकीच पाने मुलाखतीलाही, हे गणित थोडेसे चुकलेच.
– सुरेश देवळालकर, हैदराबाद

07-lp-cvrदाहक दुष्काळ
सहा मेचा दुष्काळाचे वास्तव मांडणारे लेख वाचले आणि  दुष्काळाची भीषणता कवितेतून मांडाविशी वाटली.

होतो मी सुखी. चार बिघ्यांचा राजा
झोपडी माझी, समजे मी राजवाडा
चार गुरे दावणीला, मानले त्यांना लेकुरं
संपले सारे पाण्याविना, जीवन झाले वैराण
युद्ध सुरु जगण्यासाठी विश्वास माझा ईश्वरी
वाट पाहतो पर्जन्यराजा, येशी कां सत्वरी?
तळी आटली, भूई फाटली, अदृश्य झाली नदी
दमडय़ा नाही खिशांत, उरल्या हताश मी देवा
ज्ञान माझे तोकडे घालतो तुला साकडे
मागणे माझे लई नाही, येरे येरे पावसा
– शशी वालावलकर

सर्वासाठी उपयुक्त साप्ताहिक
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. आकर्षक मुखपृष्ठ अन् भरपूर माहिती ‘लोकप्रभा’मध्ये असते. वाचक १२ रुपये खर्च करतो, तेव्हा वाचल्याचे समाधान होते. वाचनाची गोडी लागलेली आहे. मनोरंजनाशिवाय मनाला फार मोठी प्रसन्नता ‘लोकप्रभा’मुळे वाचकाला लाभत आहे. वाचनाचे वेड लागलेले आहे. घरी अंक आणल्याबरोबर सर्वप्रथम वाचण्यासाठी वेळप्रसंगी भांडणंदेखील होतात. त्यामुळे मला दोन-तीन अंक आणावे लागतात. ‘वाचाल तर वाचाल’ याची प्रचीती येते. वाचनाची भूक भागविण्यासाठी पैसे खर्च केल्याचा आनंद काही वेगळाच असतो. चांगले मासिक वाचल्याचा आनंद मिळतो.
– राम शेळके, नांदेड</strong>

08-lp-cvrजिथे तिथे भोंदूगिरीच
८ एप्रिलचा रिअल इस्टेटचा विशेषांक वाचला. त्यासंबंधी सुचलेले काही विचार मांडत आहे. मुंबईतील पहिला टॉवर म्हणायचा झाला तर ‘उषाकिरण’. या बिल्डिंगच्या फ्लॅटच्या जाहिरातीसुद्धा त्या वेळी वृत्तपत्रात छोटय़ा जाहिरातींच्या रकान्यात सात-आठ ओळीत असायच्या. हे पाहता सध्या बिल्डर वृत्तपत्रांतून त्यांच्या बांधकामाच्या पान पान भरून जाहिराती करीत असतात. जर फ्लॅट विकलेच जात नसतील  (तसे म्हणतात तरी) आणि ग्राहकांना वाजवी किमतीत घर देण्याचा दावा करतात तर जाहिरातींसाठी एवढा अवाढव्य पैसा येतो कुठून? सध्या भारतात हुश्शार अर्थतज्ज्ञांची वानवाच असल्याने याचा छडा लागणे अवघड आहे.

भोंदूगिरी करण्यासाठीच जणू काही भारतीय (मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो) पृथ्वीवर अवतार घेतो; त्याच्या नसानसात भोंदूगिरी ओतप्रोत भरलेली असते. मग त्यातून बिल्डर तरी कसे दूर राहणार? आमच्या इथे एसव्ही रोडपासून पश्चिमेकडे साधारण ३०० फूट लांबीची आणि साधारण १२ फूट, काही ठिकाणी आठ  फूट रुंदीची गल्ली आहे. गल्लीच्या दक्षिण अंगाला सहा उंच बिल्िंडग (त्यात दोन टॉवर) आहेत तर उत्तर अंगाला दुसऱ्या सोसायटीच्या भिंती आहेत. या उत्तर अंगाला असलेल्या दोन सोसायटीच्या दोन कुंपणामधून एक छोटासा रस्ता उत्तरेकडे जातो तेवढीच काय ती मोकळी जागा. येथे जर आगीसारखी दुर्घटना घडली तर फायर ब्रिगेडची एखादी गाडीच जेमतेम उभी राहून काम करू शकेल अशी परिस्थिती. तर अशा प्रकारे धोकादायक बांधकाम करणारे बिल्डर आणि त्यांना तशी परवानगी देणारे सरकारी नोकर यांना भोंदू म्हणायचे नाही तर काय? बरे, याच गल्लीत संजय निरुपम यांच्या नावांचे बाकडे आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाचा गणपती बसतो. गोपाळ शेट्टीच्या गाडय़ा फिरतात. तरी कोणाच्याही लक्षात या गोष्टी येत नाहीत म्हणजे ही मंडळी अडाणी निश्चितच नसल्याने भोंदूच असण्याची शक्यता जास्त.

आणखी उदाहरणे पाहू. अणुविद्युत प्रकल्पांतून किरणोत्सर झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी आपले शास्त्रज्ञ सज्ज आहेत, असे वारंवार आपले सरकार सांगत असते मग असे सज्ज असलेले शास्त्रज्ञ सध्या उद्भवलेल्या पाणी समस्येवर गप्प का? जपानमधली फुकुशिमाची समस्या पाण्याच्या अभावानेच घडली होती ना? तुळशीचे झाड रात्रंदिवस भरपूर प्राणवायू उत्सर्जित करीत असते. असे सरकारी प्रसारमाध्यमांतून वारंवार सांगितले जाते. तुळशीचे झाड रात्रीसुद्धा प्राणवायू सोडते हे कोणत्या भल्या शास्त्रज्ञाने कोणता प्रयोग करून सिद्ध केले? हे मात्र कधीच सांगत नाहीत. भारताचे मंगळयान कमी खर्चात आणि प्रथम प्रयत्नांत यशस्वीरीत्या मंगळाकडे नेण्यास भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी झाले आणि त्यांनी या बाबतीत अमेरिका व रशियालाही मागे टाकले, असे सरकारी माध्यमातूनही सांगितले जाते; पण भारतीय शास्त्रज्ञांना प्रवासासाठी लागणारी ट्रॅजेक्टरी (ळ१ं्नीू३१८) (यानाचे मार्गदर्शनपर रेखांकन) नासाकडून विनासायास मिळाले होते, कित्येक उड्डाणे, वेळ व पैसा खर्च करूनच नासाने ही ट्रॅजेक्टरी बनविली होती. हे मार्गरेखांकन (ळ१ं्नीू३१८) भारतीय शास्त्रज्ञांनी का बनविली नाही?
– अशोककुमार कानेटकर, बोरिवली

11-lp-cvrदुष्काळाची तमा नाही…
साडेसहाशे सालांची मोगलाई, दीडशे सालांचे इंग्रजांचे राज्य  आणि आता सदुसष्ट सालांचे स्वराज, तरीसुद्धा माझ्या महाराष्ट्र देशाच्या लोकांची तृषा ‘जैसे थे’ पाहून मला खूप वाईट वाटत  आहे. काँग्रेसने जवळजवळ चाळीस वर्षे महाराष्ट्रात राज्य केले. नंतर गेल्या वीस वर्षांत भेसळ राज्य चालू आहे, पण कुणालाच इतिहासाची, पदोपदी पसरलेल्या दुष्काळाची जरासुद्धा तमा नसावी हे पाहून आश्चर्य वाटले आहे.

महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम खासगी बोअर खोदण्याचे बंद केले पाहिजे. दुसरे, ऊसशेती बंद करायला हवी. तिसरा उपाय, शीतपेयांसाठी जमिनीतून पाणी खेचण्याचा धंदा करायला कठोर बंदी घालण्यात यावी. ठिकठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या शेतात कोपऱ्यात दहा बाय वीस बाय दोनची तळी मनरेगाच्या पैशांनी खणून द्यावी. शिवाय प्रत्येक खेडय़ापाडय़ात पाझर तलाव खोदून भूगर्भीय पाण्याची पातळी वाढवून दुष्काळाची तीव्रता कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे.

मी स्वत: जिल्हा विकास अधिकारी असताना मध्य प्रदेश राज्यातील अनेक गावांमध्ये लोकांना यासाठी प्रेरित केले आहे व त्याचे चांगले परिणाम पाहिले आहेत. यासाठी वेगवेगळ्या संस्थांतील लोकांनी पुढाकार घ्यावा व आसपासच्या लोकांना जीवन समृद्ध होण्यास मदत केली पाहिजे.
– चंद्रकांत लेले, भोपाळ म.प्र.

10-lp-cvrइतकं सगळं आलं कुठून?
‘इतकं सगळं आलं कुठून?’ ही कव्हरस्टोरी वाचली. सार्वजनिक जीवनात येण्यापूर्वीची भुजबळांची इस्टेट व सार्वजनिक जीवनात (राजकारणाचा धंदा केल्यानंतर) झालेल्या वाढीचे तुलनात्मक वर्णन झाले असते तर जास्त वजन आले असते.

पूर्वी सेवेच्या असलेल्या अनेक क्षेत्रांचा ‘धंदा’ झाला आहे. जसे पूर्वी आरोग्य सेवा होती, त्याचाही धंदा झाला आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी राजकारणाचा धंदा केला आहे. धंदा करणारे इन्कम टॅक्स तरी भरतात. सर्व कर न भरता केला जाणारा धंदा म्हणजे राजकारण असे सूत्र आज होऊ पाहत आहे. भुजबळांप्रमाणे अनेकांची कुंडली मांडणे ही एक लोकसेवा ठरावी.
– डॉ. सुभाषचंद्र मालाणी, जत, सांगली.

09-lp-cvrनियोजनाचा अभाव आणि प्रभाव!
‘नियोजनाचाच दुष्काळ’ या विषयाला वाहिलेले लेख आणि ‘मथितार्थ’ वाचले. नियोजनाचा दुष्काळ आहे, असे म्हणताना त्याच्या दोन तऱ्हा लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे नियोजनाचा खरा अभाव आणि दुसरे म्हणजे अत्यंत प्रभावी नियोजन, पण वेगळ्या उद्दिष्टाने केलेले.

विस्तीर्ण समुद्रकिनारा, पावसाळी ढग अडवून तुफान पाऊस पाडणाऱ्या पर्वतरांगा, मुबलक नद्या, असे सर्व काही निसर्गाने भारताला देऊनही पाऊस जरासा कमी झाला तरी निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई सर्वच राज्यकर्त्यांना लांच्छनास्पद आहे. या पाश्र्वभूमीवर कॅलिफोर्नियासारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये सलग तीन-चार वर्षे अपेक्षेपेक्षा खूपच कमी झालेल्या पाऊसपाण्याचे त्यांनी कसे नियोजन केले ते पाहण्यासारखे आहे. महासत्तांचे वेगळेपण युद्धापेक्षाही अशा नियोजनातून दिसते. एकीकडे उपग्रहांची मालिका अवकाशात उभी केल्यामुळे आपण कसे अमेरिकेच्या पंक्तीत बसलो आहोत म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेत आहोत आणि त्याच वेळी दुसरीकडे शहरातील सुखवस्तू नागरिकांपासून ते खेडय़ातील गरिबांपर्यंत सर्व जण टँकरची वाट पाहत असतात. अत्याधुनिक मोबाइल फोन, फोर-जी नेटवर्क आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरून पाण्याची परिस्थिती कशी आहे याची चर्चा आपण करतो हे आपल्या ‘नियोजनाचे’ विदारक चित्र आहे. नियोजनाचा ढोबळमानाने असणारा खराखुरा अभाव यातून दिसतो.

त्याच वेळी शहरात पाणीवाटपाचे मोजमाप गुलदस्त्यात ठेवणे, त्यातून होणारी ‘अर्थपूर्ण’ पाणीगळती, अनधिकृत नळजोडण्या, अर्धा ते वीस लिटपर्यंत बाटलीबंद पाण्याची तडाखेबंद विक्री, खेडोपाडी पाणी बंद नळांऐवजी खुल्या कालव्यातून नेणे, कितीही दुष्काळ पडला तरी काही मळे कायम हिरवेगार असणे हेही दिसते. हे सर्व अत्यंत हुशारीने केलेल्या प्रभावी नियोजनाशिवाय कसे शक्य आहे?

मानवी संस्कृतीचा विकास नद्यांच्या काठावर झाला. तेव्हा नद्या निसर्गनियंत्रित होत्या. मग ‘विकासाचे राजकारण’(!) सुरू झाले आणि नद्यांचे नियोजन जलसंपदा / पाटबंधारे इत्यादी खात्यांकडे आले. त्यामुळे पावसाने हलकीशी ओढ दिली तरी काय झाले हे आपण पाहतोच आहोत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत असे शाळेत शिकवले जात होते तेव्हा पाणी आणि हवा ‘असणारच’ असे गृहीत धरले होते. आता ‘वाय-फाय’ हीसुद्धा मूलभूत गरज बनली आहे असे म्हणतात; पण त्याच वेळी पाण्याने जणू काही ‘मला गृहीत धरू नका’ असा इशारा दिला आहे. नियोजनाचा अभाव आणि प्रभाव असा हातात हात घालून चाललेला दिसत आहे.
– प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

आस्तिक-नास्तिक एक जीवनप्रवास
‘नास्तिक म्हणजे दुर्जन नव्हे’ हे पत्र वाचले. नास्तिकांना दुर्जन समजण्याचे अणुमात्र कारण नाही. नास्तिक आपले विचार कुणावरही लादत नाही वा नैतिकता-न्याय-सत्य (वास्तव) कधीच नाकारत नाही. देव-ईश्वर-परमेश्वर म्हणाल तर यांना पाहिलेलं कोण आहे? तरीदेखील बहुसंख्य लोक यांना मानतात. याचे कारण याच्या भीतीने तरी सर्व मानवजात सुरक्षित राहावी एवढय़ाचकरिता. अध्यात्मात प्रगती केलेले हेच अंतिम सत्य मानतात. यांना ‘नास्तिक’ म्हणवून घेणे आवडत नसेल, तर यामुळे काही एक बिघडत नाही. नास्तिक चार्वाक आपलाच ना? आस्तिक म्हणवणाऱ्यांनीच मानवाला स्वर्ग देऊ केला. मात्र त्याकरिता इतरांना मारण्याची-मरण्याची अट घातली. जो आस्तिक स्वत: जन्माला येताना ना तृण आणू शकला ना तृण निर्माण करू शकला, तो म्हणे स्वर्ग-नरकाचा निवाडा करणार!

धर्माने नास्तिकांना नाकारलेले नाही. कारण धर्म आपले पारलौकिक – भौतिक विचार कुणावर लादतच नाही. धर्माचे स्थान पोट नव्हे, हृदय आहे. हे खरेच आहे. आज ग्रंथप्रामाण्यालाच धर्म म्हटले जाते. यानीच मानव जातीचे अधिकाधिक नुकसान आजवर केलेले आहे, नास्तिकांनी नव्हे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, जेथे मानवी प्रयत्न संपतात, तेथून ईश्वरी प्रयत्न सुरू होतात. आस्तिक-नास्तिक एक जीवनप्रवासच आहे स्वत: अनुभवयाचा..
– सूर्यकांत शानभाग, बेळगाव