18 August 2019

News Flash

Happy Teddy day 2018 : नको ‘टेडी’ला समजू…. सखी खेळणे निष्प्राण…

वाचा ही सुरेख कविता

'टेडी डे' च्या निमित्ताने...

‘टेडी’ म्हणजे अनेकांच्या आवडीचा विषय. प्रपोज आणि चॉकलेट डेच्या मागोमाग येणाऱ्या या टेडी डेच्या दिवशी एक सुरेख असा टेडी बेअर आपल्या प्रिय व्यक्तीला देण्याला बेरचजण प्राधान्य देतात. पण, हे टेडी बेअर देत असताना त्या प्रत्येक टेडीच्या रंगामागेही काही अर्थ आणि भावना दडल्या आहेत. याच भावनांना माधव दीक्षित यांनी एका सुरेख कवितेच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली आहे…

नको ‘टेडी’ला समजू
सखी खेळणे निष्प्राण ..
त्याच्या मुखी वदवेन
माझ्या प्रितीचे मी गान !

त्याच्या हाती जे हृदय
मीच धाडलेले आहे ..
धडधड त्याची जरा
तूही ऐकोनीया पाहे !

‘टेडी’सारखी गोंडस
प्रीत आपली होईल ..
त्याला घेता तू कुशीत
माझा आठव देईल !

गुलाब चॉकलेट ‘टेडी’
झाली प्रतिके चिक्कार ..
काल विचारले तुला
आज दे ना तू होकार !

माधव दीक्षित

First Published on February 10, 2018 6:51 pm

Web Title: valentines week 2018 teddy day valentines day love gift girlfriend boyfriend loved ones poem