News Flash

Valentine’s Week 2018: जाणून घ्या Kiss या शब्दाच्या जन्माची कथा

व्हॅलेंटाइन्सच विकचा सहावा दिवस म्हणजेच 'किस डे'

Valentine’s Week 2018: जाणून घ्या Kiss या शब्दाच्या जन्माची कथा
वेगवेगळ्या प्रकारच्या चुंबनासाठी वेगवेगळे शब्द (फोटो ‘लिस्टवर्से डॉटकॉम’वरून)

आज व्हॅलेंटाइन्सच विकचा सहावा दिवस म्हणजेच ‘किस डे’. ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या केवळ एक दिवस आधी येणारा हा दिवस म्हणजे प्रेमाचा शेवटचा टप्पाच म्हणावा लागेल. आज याच किस डे निमित्त आम्ही तुम्हाला किस या शब्दाचा उगम कसा झाला याबद्दल सांगणार आहोत.

किस (Kiss) हा शब्द जुन्या इंग्रजीमधील ‘सीसन’ (cyssan) या शब्दापासून जन्माला आला आहे. ‘सीसन’चा अर्थ होतो चुंबन घेणे. पण आता हा सीसन शब्द कुठून आला याबद्दल ठोस माहिती कोणालाच नसली तरी अनेकांच्या मते चुंबन घेताना लोक जो आवाज करतात त्यावरून या मूळ शब्दाची निर्मिती झाली असणार.

रोमन लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चुंबनासाठी वेगवेगळे शब्द वापरले. जसे हात किंवा गालावर घेतलेल्या चुंबनाला बासीयम (basium) म्हणत तर चुंबन घेताना तोंड बंद केल्यास त्या चुंबनाला ऑस्कूलम (osculum)  म्हणून संबोधले जात असे. तर उत्साहाने (उत्कट भावनेने) घेतलेल्या चुंबनाला सेव्हील्यूम (saviolum) म्हणून ओळखले जात असे.

ग्रीक भाषेमध्ये चुंबनासाठी शब्द नसला तरी प्रेमासाठी त्यांनी अनेक शब्द निर्माण केले. तुमच्या कुटुंबासाठी किंवा मित्रांसाठी असलेल्या निष्ठावान प्रेमासाठी फिलिया (Philia) शब्द ग्रीक लोक वापरत असत. तर दोघांमधील उत्कट प्रेमासाठी एरोस (eros) नावाने संबोधले जाई. मात्र एरोस हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो असे थोर ग्रीक लेखक आणि विचारवंत प्लॅटोने सांगितले होते. तसेच खरे प्रेम हे शारिरीक आकर्षणावर आधारित नसते असेही प्लॅटो म्हणाले होते.

तर सर्वात शुद्ध आणि कोणताही हेतू मनात न ठेवता निस्वार्थी भावनेने केलेल्या प्रेमासाठी ग्रीक लोक अॅगॅपे (agape) हा शब्द वापरत. कुटुंब आणि खूप जवळच्या मित्रांवरील प्रेम हे अशा प्रकारचे असते असे ग्रीक तत्वज्ञान सांगते.

माहिती: ‘लिस्टवर्से डॉटकॉम’वरून

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2018 9:56 am

Web Title: valentines week 2018 the origin of the word kiss
Next Stories
1 Valentine’s Week 2018: तो तिला म्हणतोय, आज धन्यवाद उद्या वाद असं नकोच आपल्या नात्यात
2 Valentine’s Week 2018 : कविता, माझी व्हॅलेंटाइन
3 Happy hug day : मिठीतली ‘मी’ पहिली की दुसरी?
Just Now!
X