‘अर्ज किया है, अर्ज किया है!

‘दिल हमारा चॉकलेट की तरह नाजूक,

Mumtaz slams Zeenat Aman for suggesting live-in
“यामुळे फॉलोअर्स वाढणार नाही”, झीनत अमान यांच्या ‘त्या’ सल्ल्यावर भडकल्या मुमताज; म्हणाल्या, “Cool आंटी…”
salman khan steps out of bandra home a day after gunfire incident
Video : घरावर झालेल्या गोळीबारानंतर पहिल्यांदाच बाहेर पडला सलमान खान, गॅलेक्सी अपार्टमेंटजवळचा व्हिडीओ व्हायरल
Shocking video Hungry Elephant Attack On Godown For Food
भुकेनं व्याकूळ झालेल्या हत्तीनं काय खाल्लं पाहा; पुढे घडलं असं की…VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

तुम उसमे ड्रायफ्रुट्स का तडका,

लाइफ होगी फ्रुट अँड नट जैसी,

अगर मील गयी गर्लफ्रेंड तेरे जैसी!’

या अशा गोड, तोंडाला पाणी आणणाऱ्या पण तरीही प्रेमाची हलकेच कबुली देणाऱ्या अनेक शायरी तुम्हाला क्लासरूमच्या बेंचवर, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आणि गेट बाहेरच्या कट्ट्यावर आज दिवसभर ऐकायला, बघायला मिळतील, “अहो का काय विचारताय?…आज ‘चॉकलेट डे’ आहे न राव!”

“ह्याला काय मित्र म्हणतात का? मित्रासाठी एक रुपयाचं मेलडी पण नाही आणि गर्लफ्रेंडसाठी शंभर रुपयांची सिल्क?” अशी रोज तक्रार करणारा बेस्ट फ्रेंडसुद्धा त्याच्या व्हॅलेंटाइन किंवा क्रशसाठी चॉकलेट आणतो, तो म्हणजे आजचा दिवस.

चॉकलेट ही मुळातच अशी गोष्ट आहे जी ९९% सगळ्यांनाच आवडतेच. पण ते खाण्यासाठी किंवा कोणाला देण्यासाठी एक विशिष्ट दिवसच का असावा असा प्रश्न विचारणारे देखील अनेक आहेत. त्यामागचं कारण असं की चॉकलेट हे गोडपणाचं आणि प्रेमाच प्रतीक आहे असं म्हटलं तरी ते काही वावगं ठरणार नाही. त्या एका विशिष्ट व्यक्तीला देताना मनातलं ते ‘कुछ कुछ होता है’ फिलिंग हे काही वेगळंच असतं. सात दिवसांच्या ह्या प्रेमाच्या आठवड्यात ज्याला आपण ‘व्हॅलेंटाइन वीक’ म्हणतो, त्यात हे आगळं, तरीही प्रत्येकाला हवंहवंस, येणारं फिलिंग हवंच नाही का! त्यात आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रपोज करून गोड नात्याला सुरुवात झाल्यानंतर त्याला किंवा तिला इम्प्रेस करण्यासाठी चॉकलेटशिवाय दुसरा चांगला पर्याय काय असणार, म्हणून ‘व्हॅलेंटाइन वीक’च्या तिसऱ्या आठवड्यात हा ‘चॉकलेट डे’ असतो.

खरंतर आजकाल ‘पहिला प्यार…बार बार लगातार’ असं असणारे बरेचजण आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या ह्या प्रत्येक पहिल्या प्रेमाला चॉकलेट देताना त्यांची उडणारी तारांबळ मात्र खरी असते. कारण आयुष्यातली ‘ती’ भेटण्याआधी चॉकलेटची खरी किंमत कळलेली नसते. एवढ्या किंमतीचा चॉकलेट घेतल्यामुळे खिशाला जाणवणाऱ्या कडकीची अवस्था दुसऱ्या कोणालाच समजू शकत नाही.

लहानपणी आईकडून हट्टाने चॉकलेट घेणारा तो, गर्लफ्रेंडचे हट्ट आणि राग मिटवण्यासाठी चॉकलेट घेऊ लागला ते ह्या प्रेमाच्या नादाने. त्यात चॉकलेटचा फ्लेव्हर तिच्या आवडीचा नसेल तर मात्र त्याचे होणारे हाल तोच जाणो. कारण त्यावेळी कदाचित त्याला चॉकलेट म्हणजे फक्त गोडपणा नसून त्यात ‘डार्क चॉकलेट’देखील असते ह्याची अनुभूती येत असावी.

चॉकलेट डे साजरा करणारे अजून एक प्रकारचे असतात, ज्यांचा व्हॅलेंटाइन हा त्यांचा ‘बेस्ट फ्रेंड’च असतो ना भाऊ! ‘भावा, हीच का आपली दोस्ती’ म्हणत एक मस्तपणे प्रेमाची झप्पी देणाऱ्या ही बेस्ट फ्रेंडची जोडी बाकी कोणते डे साजरे करत नसली तरी चॉकलेट डे मात्र आवर्जून साजरा करते. मग त्या चॉकलेटच स्वरूप हे एक रुपयांचं मेलडी किंवा पाच रुपयांचे जेम्स का असेनात. पण ते एवढंसं चॉकलेटदेखील हे बेस्ट फ्रेंड्स अगदी हक्काने वाटून खातात, चॉकलेट डेचा आनंद लुटतात.

तर असा हा चॉकलेट डे, जो लग्न झालेले, ‘पर्मनंट कपल’, बरेच वर्ष एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आणि जे दर महिन्यात पहिल्यांदा प्रेमात पडतात आणि ‘भावा’ अशी एक हाक आल्यावर धावून जाणारे बेस्ट फ्रेंड्स आणि आई मला येताना चॉकलेट घेऊन येशील ना असं आईला सांगणारं ते पिल्लू, असे सगळे साजरा करतात. कारण, ‘जिंदगी मे कुछ मिठा होना जरुरू होता है.’

शब्दांकन- श्रुती जोशी