News Flash

माउलींचा पालखी सोहळा फलटण मुक्कामी

फलटणकरांनीही परंपरेप्रमाणे पालखी सोहळय़ाचे आणि वारकऱ्यांचे दिमाखदार स्वागत केले.

माउलींचा पालखी सोहळा फलटण मुक्कामी
माउलींचा पालखी सोहळय़ाने सोमवारी एक दिवसाच्या मुक्कामासाठी फलटण नगरीत प्रवेश केला. 

हरिनामाचा गजर आणि विठ्ठल-रखुमाईच्या भावरसात सायंकाळी पालखी सोहळय़ाने सोमवारी एक दिवसाच्या मुक्कामासाठी फलटण नगरीत प्रवेश केला. फलटणकरांनीही परंपरेप्रमाणे पालखी सोहळय़ाचे आणि वारकऱ्यांचे दिमाखदार स्वागत केले.

तरडगावचा मुक्काम संपवून पालखी सोहळा सकाळी सहा वाजता फलटणच्या पुढील मुक्कामासाठी रवाना झाला. पालखी सोहळय़ाबरोबरचे वारकरी, भाविकही रवाना झाले. आजचा तरडगाव ते फलटण हा पालखी सोहळय़ाचे अंतर अठरा किलोमीटर एवढे मोठे असल्याने हरिनामाच्या आणि टाळमृदुंगाच्या नादात पालखी सोहळा मार्गस्थ झाला होता. माउलींच्या रथापुढे मानाच्या िदडय़ा, पुढे सनईचौघडा वाजवणारी बलगाडी, त्यामागे चोपदारांचा अश्व चालत होते. रथाच्या मागे अधिकृत िदडय़ांचे वारकरी चालत होते. न्याहारीसाठी सुरवडी, तर दुपारचे जेवण दीड वाजता वाजता िनभोरे येथे संध्याकाळच्या वडजलच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा फलटणच्या वेशीवर पोहोचला. आजूबाजूच्या गावांनी वारकऱ्यांच्या जेवणाची चांगली व्यवस्था केली होती. पुन्हा दोन वाजता सोहळा फलटणकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी पाच वाजता सोहळा फलटणच्या जिंती पुलावर आला. पालिका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी विजय देशमुख, नगराध्यक्षा नीता नेवसे, मुख्याधिकारी धर्यशील जाधव, सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत पालखी सोहळय़ाचे स्वागत करण्यात आले. राम मंदिर ट्रस्ट व नाईक िनबाळकर देवस्थानचे संजीवराजे नाईक निबांळकर व यशोधराराजे नाईक निंबाळकर यांनी स्वागत केले. तेथून सोहळा मलठण, सद्गुरू हरिबुवा महाराज समाधी मंदिर,पाचबत्ती चौक, बादशाही मशीद, राम चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका माग्रे विमानतळावर मुक्कामासाठी सात वाजता विसावला. समाजआरतीनंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

सर्व व्यवस्थेवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. पोलीस यंत्रणेने ठिकठिकाणी बंदोबस्त लावला आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश धस व त्यांचे सहकारी तळावर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था केली आहे. पालखी तळ निरीक्षणासाठी वीस फूट उंचीचा मनोरा उभारण्यात आला आहे. पालखी सोहळय़ाच्या स्वागतासाठी सर्व सामाजिक संस्था, तरुण मंडळे, शासकीय कार्यालये वारकऱ्यांच्या खानपानाची व्यवस्था केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 3:05 am

Web Title: sant tukaram and sant dnyaneshwar wari palkhi yatra 2017 pat 11
Next Stories
1 आषाढी यात्रेच्या कामांचा बोजवारा!
2 तुकोबांच्या पालखीला धोतराच्या पायघडय़ा, मेंढय़ांचे रिंगण
3 ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांना नीरा स्नान
Just Now!
X