नाशिक येथील आधारतीर्थ आश्रम शाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले ‘आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली. ती चुक तुम्ही करू नका’ अशा आशयाचा फलक घेऊन संत तुकाराम महाराजाच्या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत. ‘मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकड़े लक्ष द्या’ अशी एकच हाक दिंडीतील मुलांकडून ऐकण्यास मिळाली.

नाशिक येथील आधारतीर्थ आश्रममध्ये राज्यातील विविध भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. तेथील मुलांची दिंडी आळंदी ते पंढरपूर या दरम्यान असून या दिंडीचे यंदा पाचवे वर्ष आहे. यामध्ये वयोगट ५ ते १५ वर्षापर्यंतची ५० मुले सहभागी झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, आत्महत्या हा पर्याय नाही, असा संदेश असलेल्या टोप्या त्या विद्यार्थ्यांनी घातल्या होत्या. उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या.

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

farmers-dindi21_1

या वेळी अशोक मोतीराम पाटील म्हणाला की, माझ्या वडिलांनी मी ४ वर्षांचा असताना आत्महत्या केली. आजही राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी कायमस्वरूपी निर्णय घेण्याची गरज असून मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकडे लक्ष द्या आणि शेतकऱ्ंयाचे राज्य येऊ द्या, अशी मागणी केली.