30 September 2020

News Flash

तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत स्वागत!

तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज आकुर्डीत असणार आहे

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूच्या इनामदारवाड्यातून प्रस्थान झाले. देहूरोड येथून पालखी आज निगडीच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि पिंपरी चिंचवड उद्योग नगरी संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्ती-शक्ती चौकात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने या पालखीचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. दिंडी प्रमुखांना महापालिकेकडून ताडपत्रीही भेट देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड उद्योग नगरीत आज संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या पालखीचे टाळ-मृदुंगाच्या गजरात आगमन झाले. यावेळी सगळेच वारकरी तुकाराम महाराजांच्या नामघोषात तल्लीन झालेले बघायला मिळाले. महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रवण हर्डीकर हे पालखीच्या स्वागतासाठी हजर होते. यावेळी विविध संस्थांतर्फे पाणी, अन्न आणि फळांचे वाटप करण्यात केले.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज आकुर्डीतल्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरात होणार आहे. निगडीकरांनीही पालखीचे स्वागत केले. ४ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी पालखीचे प्रस्थान झाले आहे. वारी हा एक आनंद सोहळा असतो. या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी तहान-भूक विसरून विठ्ठलाच्या पायाशी जाण्यासाठी मार्गस्थ होतात. आता पुढचे अनेक दिवस हा असाच उत्साह बघायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2017 8:35 pm

Web Title: tukaram maharaj palkhi leaves dehu today
Next Stories
1 टाळ मृदंगाच्या निनादात माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान
2 तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान…
3 भक्तीरंग उधळत तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Just Now!
X