‘जगी तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या ओळी प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात त्या पंढरीच्या वारीत. जात, धर्म, परंपरा यांच्या पलीकडे गेलेला पालखी सोहळा अवघ्या जगाला एकात्मतेचा संदेश देतो. म्हणूनच गेल्या तीनशे वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा घेते ते अनगडशाह बाबा दर्ग्यात. त्यातच यंदा मुस्लिमाचा पवित्र रमजान महिना असल्यानं या भेटीला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.

जाती धर्मातील कलहांना छेद देणारे अनेक प्रसंग वारीत पहायला मिळतात. तुकाराम महाराज पालखीचा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यातील विसावा हा प्रसंगही सामाजिक एकतेसह धर्माच्या पलिकडे असलेल्या भक्तीचा प्रत्यय देतो. त्यातच मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने या भेटीला अधिक महत्व प्राप्त झाले. अनगडशाह बाबा हे तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात. जगदगुरू तुकाराम महाराजांची विठ्ठल माऊलीप्रती असलेली अजोड भक्ती, आसक्ती आणि महाराजांचा दानशूरपणा यामुळे या मुस्लीम संताने जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिष्यत्व पत्करल्याची आख्यायिका आहे आहे. त्यामुळेच आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीन देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा घेतला अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात घेतला जातो.

What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”
Departure of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony on 29th June
पुणे : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान
Baba Jumdev
विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा