वसई: विविध कारणांमुळे आत्महत्या करण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.२०२४ या वर्षात मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील तब्बल ४४० जणांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक आत्महत्या या गळफास घेऊन करण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षात दिड हजार लोकांनी आपले जीवन संपवले आहे.

विविघ कारणांमुळे आत्महत्या करण्याच्या प्रमाण वाढत आहे. त्यात कौटुंबिक कलह, प्रेमभंग, आजारपण, परिक्षेतील अपयश तसेच क्षुल्लक कारणामुळे आत्महत्या केल्या जातात. २०२४ या वर्षात तब्बल ४४० जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे ३६४ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत. महिन्याला सरासरी ३५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मे महिन्यात ४०, जून मध्ये ४२ तर नोव्हेंबर महिन्यात ४६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. गळफास घेऊन आत्महत्या करण्याकडे लोकांना अधिक कल आहे. एकूण आत्महत्यांपैकील ३६४ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत.

sant Tukaram maharaj suicide news in marathi
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
pimpri chinchwad city 6 suicides in a day
Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी सहा आत्महत्या
Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या
Former MP Kisanrao Bankheles son commits suicide
माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मुलाची आत्महत्या

हेही वाचा >>>वसईत आरटीई  प्रवेशासाठी १५३ शाळांत साडेतीन हजार जागा राखीव; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चिंताजनक

परिक्षेचा तणाव, मिळालेले कमी गुण तसेच अनुत्तीर्ण झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. वसई आणि भाईंदर मध्ये १० आणि १२ वीच्या निकालानंतर एकूण ६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहे. कमी गुण मिळाल्याने ३ विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्या आहेत. तर ९ वी मध्ये अनुत्तीर्ण झाल्याने २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

हेही वाचा >>>वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प

वर्ष- २०२४

एकूण आत्महत्या- ४४०

गळफास घेऊन- ३६४

विष प्राशन करून- २७

उंचीवरून उडी मारून- ९

औषध पिऊन- ५

पाण्यात उडी मारून- ४

नस कापून- १

जाळून घेऊन- १

प्रमुख आत्महत्या

७ जुलै

वसईतील हरिष मेहता (६०) आणि त्यांचा मुलगा जय मेहता (३०) यांची भाईंदर रेल्वे स्थानकात ट्रेन खाली आत्महत्या

२१ एप्रिल

अभय पालशेतकर (२८) या तरुणाने चित्रफित तयार करून आत्महत्या

१७ डिसेंबर

अर्नाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक  रतीकांत भद्रेशेट्टे (३५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

९ ऑक्टोबर

भाईंदरच्या उत्तन येथे आरमान अब्दुल सय्यद (८) या मुलाने आईने अनाथाश्रमात ठेवल्याने आत्महत्या

२९ जुलै

उत्तरप्रदेशातून पळवून आणलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या

मागील ५ वर्षातील आत्महत्यांची आकडेवारी

वर्ष        आत्महत्या

२०१९-      ३३७

२०२०-      ३६३

२०२१-      ४३०

२०२२-      १७९

२०२३-       ४४३

Story img Loader