scorecardresearch

Premium

माजी स्थायी समिती सभापतीकडे मागितली १ कोटींची खंडणी ;  विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विरार मघ्ये राहणारे प्रशांत राऊत हे बहुजन विकास आघाडीचे नेते असून वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आहे.

1 crore extortion demanded from former vvmc standing committee chairman
प्रातिनिधिक फोटो

वसई- ईडीचा अधिकारी असल्याचे सांगून वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार मघ्ये राहणारे प्रशांत राऊत हे बहुजन विकास आघाडीचे नेते असून वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन येत होता. किशाोर अंबावकर असे त्याने आपले नाव सांगितले होते. मी  ईडीचा अधिकारी असल्याचे सांगून ईडीचा समेमीरा टाळण्यासाठी १ कोटींची मागणी केली. सुरवातीला राऊत यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वारंवार ही व्यक्ती फोन करून ईडी आणि सीबीआयची धमकी देत पैशांची मागणी करत होता.

slum rehabilitation authority, mumbai municipal corporation, slum rehabilitation authority washrooms, cm eknath shinde visit sra
एसआरए प्राधिकरणाची जबाबदारी महानगरपालिकेच्या खांद्यावर; मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे एसआरए वसाहतीमधील प्रसाधनगृहांची दुरुस्ती महानगरपालिका करणार
three strong personality in pimpri joined ncp just after sharad pawar visit
पिंपरी-चिंचवड दौऱ्यानंतर शरद पवार गटात इनकमिंग सुरू; कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी लवकरच होणार मेळावा
youth congress protest in chandrapur, youth congress shivani wadettiwar chandrapur, congress leader vijay wadettiwar
चंद्रपूर महापालिका प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
MLA Narendra Bhondekar, shivsena, politics , politics news
शिवसेनेच्या दोन गटाच्या वादात अडकले आमदार भोंडेकर ; विधानसभा अध्यक्षांसमक्ष बाजू मांडताना नेमक काय घडलं,वाचा…

हेही वाचा >>> वसई विरार : काल केली स्वच्छता, आज पुन्हा कचरा, स्वच्छता मोहीम संपताच ये रे माझ्या मागल्या

शनिवार ३० सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास त्यांना किशाोर अंबावकर नावाच्या व्यक्तीने फोन केला. मला बॅंक ऑफ इंडियाजवळ १ कोटी रुपये आणून दे अन्यथा ईडी, आयकर आणि सीबीआयची चौकशी मागे लावेन अशी धमकी दिली. या प्रकरणी राऊत यांनी सोमवारी रात्री विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संबंधित मोबाईल धारकाविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी या व्यक्तीला ओळखत नाही. मागील तीन महिन्यांपासून तो मला धमकी देत होता. त्यामुळे मी पोलिसात तक्रार दाखल केली असे प्रशांत राऊत यांनी सांगितले. या मागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 1 crore extortion demanded from former vvmc standing committee chairman zws

First published on: 03-10-2023 at 19:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×