वसई : विरारमध्ये एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तिच्या मैत्रिणीचाही समावेश आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी तिच्या मैत्रिणीसह तीन जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित मुलगी १२ वर्षाची असून ती विरारमध्ये राहते. मंगळवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मोबाईल दुरुस्त करण्यासाठी ती बाहेर निघाली होती. त्यावेळी तिची मैत्रीण तिला भेटली. आपण फिरायला जाऊ असे सांगून तिने तिला विरार पूर्वेच्या साईदत्त नगर येथील निर्जन ठिकाणी नेले. या ठिकाणी तिच्या मैत्रिणीचे तीन मित्र हजर होते. या तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी तिची मैत्रीणही तिथे हजर होते. रात्री दीडच्या सुमारात ही घटना घडली असून त्यांनी मुलीला पहाटे ५ वाजता घरी सोडले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 year old girl was gang raped by her 3 friends in virar zws
First published on: 18-08-2022 at 22:59 IST