नालासोपाऱ्यात  १५ वर्षाची मुलगी नाल्यात वाहून बेपत्ता

पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या मदतीने तीचे शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.

नालासोपाऱ्यात  १५ वर्षाची मुलगी नाल्यात वाहून बेपत्ता
नालासोपारा पूर्वेच्या धानीव बाग परिसरात राहणारी १५ वर्षीय दिक्षा यादव ही मुलगी घराजवळील नाल्यात पाय घसरून पडल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे.

विरार – मंगळवार सकाळ पासून कोसळणाऱ्या पावसाने शहरातील नाले भरून वाहू लागले आहेत. अशातच नालासोपारा येथे शौचालयासाठी गेलेली एक १५ वर्षीय मुलगी नाल्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या मदतीने तीचे शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.

मंगळवार सकाळ पासूनच शहरात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून नाले भरून वाहू लागले आहे. अशातच नालासोपारा पूर्वेच्या धानीव बाग परिसरात राहणारी १५ वर्षीय दिक्षा यादव ही मुलगी घराजवळील नाल्यात पाय घसरून पडल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे.

पेल्हार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा धानकवा बाग येथील सिद्धीविनायक चाळीत राहत होती. दुपारी १ वाजताच्या सुमारास ती घराजवळील शौचालयात गेली होती. हे शौचालय नाल्याला लागूनच आहे. परत येताना पावसाने जमीन ओली असल्याने तीचा पाय घसरला आणि तोल जाऊन ती नाल्यात पडली. पावसामुळे नाला अधीक प्रवाहाने वाहत असल्याने ती प्रवाहाबरोबर वाहत गेली. या घटनेमुळे पुन्हा एकदा उघड्या नाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील आठवडाभरातउ उघड्या नाल्यात वाहून गेल्याची ही दुसरी घटना आहे. या अगोदर महापालिकेचा सफाई कर्मचारी उघड्या नाल्यात वाहून गेला होता. आठ दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. तर मागच्या वर्षी उघड्या नाल्याचा शिकार ठरलेला ८ वर्षीय अमोल सिंग याचा अजूनही पत्ता लागला नाही.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 15 year old girl went missing in nalasopara after fall in open drain zws

Next Story
विरार विषबाधा प्रकरणातील गूढ कायम ; जखमी मुलीला उपचारासाठी मुंबईला हलवले
फोटो गॅलरी