वसई : Minor Girl Commits Suicide in Mira road after Rape :उत्तरप्रदेशातून पळवून आणलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केल्याची घटना काशिमिरा येथे घडली आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी दोन तरुणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी १७ वर्षांची असून उत्तरप्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील फुलपूर तालुक्यात राहणारी आहे. हेही वाचा >>> Virar Resort : विरार नवापूर येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई; शिवसेना नेत्याच्या मुलाचा मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर कारवाई गालिब शेख (२०) या तरुणाने तिला फूस लावून काशिमिरा येथे आणले. पेणकर पाडा येथील एका खोलीत ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या शोधघेत तिचे कुटुंबिय मिरा रोड येथे आल्यावर हा प्रकार रविवारी उघड झाला. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी गालिब शेख आणि त्याचा साथादीर मोह्ममद तालीब शेख (२२) या दोघांविरोधात अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्या संहितेच्या कलम १३७(२), ८७,९६, ६४(१) १०८ तसेच बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सोच्या कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.