वसई: वसई-विरार शहराला सूर्या पाणी प्रकल्पातून मिळणाऱ्या १८५ दशलक्ष लिटर पाण्याच्या वितरणासाठी पालिकेने ९७ कोटींच्या योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. या योजनेअंतर्गत समांतर जलवाहिन्या टाकून पाणी शहरातील अस्तित्वात असलेल्या जलावाहिन्यांत आणून वितरित केले जाणार आहे. यामुळे शहराला एकूण ४१५ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.
वसई-विरार शहराला सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यातून २३० दशलक्ष लिटर, पेल्हार धरणातून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर असा एकूण २३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. शहराला ३२६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ २२० दशलक्ष लिटर्स पाणी मिळते. शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यामुळे पाण्याची मोठी मागणी आहे. जे पाणी मिळते त्यातही तूट असल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
एमएमआरडीएतर्फे सूर्या पाणी प्रकल्पातून ४०३ दशलक्ष लिटर पाण्याची योजना आहे. त्यातील १८५ दशलक्ष लिटर पाणी वसई विरार शहरासाठी आणि २१८ दशलक्ष लिटर पाणी मीरा भाईंदर शहरासाठी देण्याची योजना तयार केली आहे. या योजनेचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू असून हे पाणी या वर्षांच्या सप्टेंबर अखेपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहराला दररोज ४१५ दशलक्ष लिटर एवढे पाणी मिळणार आहे. त्यानंतर पाणीटंचाई कमी होऊ शकणार आहे. परंतु हे पाणी ५३ गावांसहित महापालिका क्षेत्राला देण्यासाठी जलकुंभ आणि जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. त्याचा खर्च ५०० कोटींचा असून त्याला वेळ लागणार आहे. यामुळे पालिकेने १८५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी शहरात वितरित करण्यासाठी ९७ कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे.
अमृत योजना दोन महिन्यात पूर्ण होणार
पाण्याचे वितरण करण्यासाठी पालिकेने २०१६ मध्ये अमृत योजना तयार केली आहे. १३९ कोटींच्या या अमृत योजनेचा उद्देश शहराच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविणे हा आहे. या योजनेअंतर्गत १८ जलकुंभ उभारणे तसेच २८४ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याचा कामाचा समावेश होता. शहरात असलेल्या जुन्या जलवाहिन्या कमी व्यासाच्या होत्या. तसेच त्या गंजल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळायचे. या सर्व जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत सव्वा दोनशेहून अधिक किलोमीटपर्यंत जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर ८ जलकुंभ बांधून झाले असून इतर जलकुंभ उभारणी करण्याची कामे ही प्रगतीपथावर आहेत. मे अखेपर्यंत या योजनेचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर नागरिकांना नवीन नळजोडण्या देण्यात येतील आणि पाण्याचा प्रश्न सुटेल, असेही शहर अभियंता गिरगावकर यांनी सांगितले.
असे मिळेल पाणी
एमएमआरडीएन १८५ दशलक्ष लिटर पाणी काशिद कोपपर्यंत आणून देणार आहे. तेथील एमबीआरमधून पाणी पालिका घेऊन ते शहरात वितरित करणार आहे. सध्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने पालिकेने जलवाहिन्यांपर्यंत पाणी नेण्यासाठी समांतर जलवाहिन्या टाकण्याची योजना तयार केली आहे. यानुसार काशिद कोपरपासून समांतर जलवाहिन्यांतून हे पाणी पालिकेच्या सध्याच्या कार्यरत जलवाहिन्यांत आणण्यात येईल आणि तेथून ते वितरित केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे शहर अभियंता एम. जी. गिरगावकर यांनी दिली.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास