scorecardresearch

वसई विरार महापालिकेचा ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सादर, करवाढ नाही, विकास कामात भरघोस वाढ

वसई विरार शहर महापालिकेचा सन २०२३-२४ आर्थिक वर्षांचा २ हजार ९६८ कोटींचा सुधारीत अंदाज आणि सन २०२४-२५ या वर्षांचे मुळ अंदाज असलेला ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी सादर झाला.

budget of Vasai Virar mnc
वसई विरार महापालिकेचा ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सादर, करवाढ नाही, विकास कामात भरघोस वाढ (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

वसई- वसई विरार शहर महापालिकेचा सन २०२३-२४ आर्थिक वर्षांचा २ हजार ९६८ कोटींचा सुधारीत अंदाज आणि सन २०२४-२५ या वर्षांचे मुळ अंदाज असलेला ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी सादर झाला. १२ कोटी ३३ लाख रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत ३३२ कोटींनी वाढ करण्यात आली आहे. हे निवडणुकांचे वर्ष असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने कुठलीही करवाढ केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

वसई विरार महापालिकेचा ४ था प्रशासकीय अर्थसंकल्प पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांना सादर केला. यावेळी मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा अधिकारी (कॅफो) अभय देशमुख तसेच पालिकेचे सर्व उपायुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होेते.

29 villages vasai virar city, vasai virar municipal corporation
२९ गावे वसई विरार महापालिकेतच राहणार, उच्च न्यायालयाने सर्व याचिका केल्या बरखास्त
Mira Bhayander new police
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात ९४५ नवीन पोलीस रूजू
youth sentenced to 10 years imprisonment by vasai sessions court for sexually and financially exploited college girls
मॉडलिंगच्या नावाखाली अनेक तरुणींचा लैंगिक आणि आर्थिक छळ; आरोपीला १० वर्ष कारावासाची शिक्षा
As Ro Ro service will start there will be a saving of 55 minutes in travel time between Vasai Bhayandar
वसई भाईंदर दरम्यान प्रवास वेळेत ५५ मिनिटांची होणार बचत

हेही वाचा – वसई-विरार : जात पंचायच बरखास्त, दहशत मात्र कायम; दंड परत केलाच नाही, ग्रामस्थांवर गुंडगिरी सुरू

हेही वाचा – शहरबात: वाहतूक धोरण राबविण्यात उदासिनता

प्रशसाकांकडून अंदाजपत्रकातील तरतुदींवर चर्चा केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. मागील वर्षाच्या अर्थसंकल्पातून पालिकेने जवळपास ८० टक्के निधी खर्च केला आहे. मालमत्ता, नगररचना शुल्क, बाजार फी, पाणीपट्टी यातून पालिकेला चालू आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात पालिकेने या उत्पन्नाच्या उद्दिष्टात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा विकास आराखडाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी भौगोलिक मानांकनासाठी ३६ कोटींची वाढ करण्यात आली आहे. नवीन नोकर भरती, अधिकार्‍यांच्या नियुक्ती तसेच अनेक कर्मचार्‍यांना कायम सेवेत घेतले जाणार असल्याने आस्थापना खर्चातही वाढ केली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात भांडवली अनुदान १६४ कोटींचे होते ते पुढील आर्थिक वर्षात ४१३ कोटी एवढे वाढविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 3 thousand 112 crore budget of vasai virar mnc no tax hike massive increase in development work ssb

First published on: 12-02-2024 at 19:58 IST

आजचा ई-पेपर : वसई विरार

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×