scorecardresearch

विरारमध्ये चोरट्यांचा सिनेस्टाईल दरोडा, गॅस कटरने ATM फोडून १७ लाख केले लंपास

विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएमवर काही चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे.

विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएमवर काही चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी पहाटे चार ते पाच चोरट्यांनी हा दरोडा टाकला आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधून सुमारे १७ लाख २१ हजार ९०० रुपयाची रोकड लंपास केली आहे. याबाबतची माहिती एसबीआय बँकेकडून देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फुलपाडा परिसरातील गांधीचौक येथील राजा अपार्टमेंटमध्ये एसबीआय बँकेचं एटीएम आहे. मंगळवारी पहाटे चार ते पाच चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडलं आहे. एटीएम फोडल्यानंतर भामट्यांनी सिनेस्टाईल पद्धतीने सर्व रोकड घेऊन पोबारा केला. यासंदर्भात विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विरार गुन्हे शाखेचे पोलीस सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे. संबंधित एटीएम सेंटरला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती, असंही माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 4 to 5 robbers broke sbi atm with gas cutter and stole 17 lakh rupees in virar crime in thane rmm

ताज्या बातम्या