वसई: मिरा रोड मधून मध्यवर्ती गुन्हे शाखेने पन्नास लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी गुजरात मधील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या नोटा कुठे छापल्या आणि कुठे वितरित केल्या जाणार होत्या, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. काळ्या पैशांच्या देवाण-घेवाणीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. शनिवारी काशिमिरा येथे एक तरुण बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी डॉन बॉस्को शाळेजवळ असलेल्या मुन्शी कंपाउंड येथे सापळा लावून आर्यन जाबूचा (१९) या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगेत ५३ नोटांची बंडले आढळली. त्या एकूण ५१ लाख ७१ हजारांच्या नोटा आढळून आल्या.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हा तरुण मूळ गुजरात राज्यातील भावनगर येथे राहणारा आहे. त्याने या बनावट नोटा कुठून आणल्या आणि कुणाला वितरित करणार होत्या याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी दिली. या आरोपीने ठाण्यातील एका व्यक्तीने या नोटा विक्रीसाठी दिल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस त्याच्या दाव्याची पडताळणी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा तरुण शहरात विक्री साठी आला होता. मात्र या बनावट नोटांच्या निवडणुकीशी संबध नसल्याचे राख यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त

ही कारवई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती मृन्हे प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेन्द्र विचारे आदींच्या पथकाने केली.

बाजारात बनावट नोटा?

आरोपी आर्यन जाबूचा या बनावट नोटांच्या व्यवहारात सक्रिय आहे. त्याच्याकडे असलेल्या ५० लाखांच्या बनावट नोटा तो २५ लाखात विकणार होत्या. या नोटा मग किरकोळ बाजारात वापरात आणल्या जाणार होत्या. त्यामुळे बनावट नोटा चलनात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Story img Loader