मीरा-भाईंदर शहरात करोनाकाळात ८६७८ नागरिकांचा मृत्यू

गेल्या दीड वर्षांपासून करोनाचे संकट डोक्यावर असताना मीरा-भाईंदर शहरात आठ हजार ६७८ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या १३३४

भाईंदर :  गेल्या दीड वर्षांपासून करोनाचे संकट डोक्यावर असताना मीरा-भाईंदर शहरात आठ हजार ६७८ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. यातील एक हजार ११३ नागरिकांचा मृत्यू करोनामुळे झाला असल्याची नोंद पालिका दप्तरी करण्यात आली आहे. तर पूर्वीच्या तुलनेत मृत्युसंख्येत वाढ झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

करोना आजाराने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. मीरा-भाईंदर शहरात करोना आजाराचा प्रथम रुग्ण ३० मार्च २०२० रोजी आढळून आला होता. त्यानंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊन अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यात दुसऱ्या लाटेत अधिक रुग्णवाढ झाली असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी समोर आलेल्या अहवालानुसार एकूण ५० हजार ५८९ नागरिकांना करोनाची बाधा झाली असून तब्बल १ हजार ३३४  नागरिकांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यापूर्वी अधिकाधिक उपाय योजना आखण्याकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे.मात्र अश्या परिस्थितीत करोना काळात तब्बल ८ हजार ६७८ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या जन्म—मृत्यू विभागात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार  करोन काळ सुरु झाल्यानंतर  २०२० रोजी पाच हजार ४२७ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यात २ हजार २३६ ष्टद्धr(२२९ी आणि ३ हजार ३९१ पुरुषाचा समावेश आहे.तसेच २०२१ रोजी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत  ३ हजार २५१ नागरिक मरण पावले आहेत. यात एकूण एक हजार ३७६ ष्टद्धr(२२९ी आणि १ हजार ८७५ पुरुषाचा समावेश आहे.तसेच पालिका दप्तरी असलेल्या माहितीनुसार २०१८ रोजी ४ हजार ३१८ व २०१९ रोजी ४ हजार ७६० इतक्या नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत करोना काळात मृत्यू  पावणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 8678 civilians killed corona period mira bhayandar city ssh

ताज्या बातम्या