वसई- नालासोपारा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत असेलल्या ९ आरोपींना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व आरोपांना पालिकेच्या रुग्णालात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.नालासोपारा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत सध्या ९ आरोपी आहेत. त्यापैकी ५ आरोपी नालासोपारा पोलीस ठाण्याचे तर ४ आरोपी पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आहेत.

मंगळवारीू दुपारी या आरोपींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले होते. त्यांनतर काही वेळात दोन आरोपींना उल्ट्या सुरू झाल्या. पाठोपाठ इतर आरोपींनाही तोच त्रास सुरू झाला. त्यामुळे या सर्व आरोपींना नालासोपारा येथील पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्व आरोपींची प्रकृती स्थिर असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित