मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वसई पूर्वेच्या सातीवली कोंडापाडा येथील भागात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई पूर्वेच्या भागात सातीवली परिसर आहे. याच भागातील डोंगराला लागूनच कोंडापाडा आहे. दोन दिवसांपासून वसईत पावसाचा जोर प्रचंड आहे. शनिवारी सकाळी सतत सुरू असलेल्या पावसामुळे कोंडापाडा येथेआठ ते नऊ मीटर एवढी दरड कोसळली आहे. याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी धाव घेत. त्यात दरडीखाली अडकून पडलेला टेम्पो बाजूला केला. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. सध्या स्थितीतदरड कोसळण्याच्या ठिकाणी सर्व चाळीतील रूम खाली करून अतिक्रमण विभागामार्फत सिल करण्यात आले असून दरड कोसळेला भाग मोकळा करण्यात आला असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.याआधी राजावळी येथील वाघराळपाडा येथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या चाळींवर दरड कोसळली होती.

More Stories onवसईVasai
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A landslide occurred at sativali konda pada in vasai amy
First published on: 17-09-2022 at 16:53 IST