A massive fire broke out at a factory in Nalasopara | Loksatta

वसई : नालासोपाऱ्यात कारखान्याला भीषण आग

आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीचे लोळ उसळत आहेत. अद्याप आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही

fire broke out at a factory in Nalasopara
नालासोपाऱ्यात कारखान्याला भीषण आग

नालासोपारा पूर्वेच्या वाकणपाडा येथे रामा इंडस्ट्रीमधील एलईडी तयार होत असलेल्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा- वीजगळती कमी करण्यासाठी महावितरणची उपाययोजना; गत वर्षीच्या तुलनेत गळती दोन टक्क्यांनी कमी

नालासोपारा पूर्वेच्या वाकणपाडा येथील रामा इंडस्ट्री असून यात अवधूत आश्रम येथे एलईडी तयार करण्याचा कारखाना आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे या कारखान्यात आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या आगीची माहिती स्थानिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली असून घटना स्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून
आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीचे लोळ उसळत आहेत. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागले याचे कारण समजू शकले नाही.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 12:45 IST
Next Story
वीजगळती कमी करण्यासाठी महावितरणची उपाययोजना; गत वर्षीच्या तुलनेत गळती दोन टक्क्यांनी कमी