भाईंदर : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सासुनवघर परिसरातील ‘सेल्फी धाबा’ येथे बेकायदेशीररीत्या होणाऱ्या मद्यविक्रीवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देशी व विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही हॉटेलांमध्ये परवानगीशिवाय मद्यविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या पथकाने संबंधित हॉटेलांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली. गुरुवारी रात्री ‘सेल्फी’ धाबावर छापेमारी करून मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली.

या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात हॉटेल चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, अशा कारवाया वरिष्ठांच्या सूचनेनंतरच का होतात? स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग स्वतःहून कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

लॉजिंगवरही छापा

याच हॉटेलमधील लॉजिंगवर देखील पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.या कारवाईत ७ दलालांना अटक करण्यात आली असून १० महिलांची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली