लोकसत्ता वार्ताहर

भाईंदरर : मिरा-भाईंदरमधील अनधिकृत बार विरोधात कारवाईची मोहीम अखेर महापालिका प्रशासनाने गुरुवारपासून हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २२ बारवर ही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून जाहिर करण्यात आले आहे.

Gondia Youth Congress protest against mahayuti government
“भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा गे मारबत…” गोंदिया युवक काँग्रेसकडून निषेध
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Power contract workers union hunger strike postponed
ऊर्जामंत्र्यांशी चर्चेनंतर कंत्राटी कामगार संघटनेचे उपोषण स्थगित
massive protest in kolkata demanding resignation of cm mamata banerjee
पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाने तणाव; डॉक्टर प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसासह आंदोलक जखमी
vinod tawde latest marathi news
भाजपची २ सप्टेंबरपासून देशव्यापी सदस्य नोंदणी, सरचिटणीस विनोद तावडे यांची घोषणा
The High Court issued a warning to the State Government regarding the Advisory Board for the Disabled Mumbai news
सप्टेंबरपर्यंत अंपगांसाठीचे सल्लागार मंडळ कार्यान्वित करा; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले
bharat bandh on august 21
Bharat Bandh : २१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ची हाक; जाणून घ्या ‘बंद’मागचं नेमकं कारण?
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद

तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याने गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक कारवाईचे निर्देश दिेले होते. ठाणे आणि मिरा भाईंदर शहरामधील अनधिकृत बारवर कारवाई करण्याचे खास निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने गुरुवारी कारवाईची योजना आखली. सध्या शहरात जवळपास १३० हून अधिक बार व ३ पब आहेत.यातील अनधिकृत बांधकाम केलेल्या २२ बारची यादी प्रशासने तातडीने तयार केली आहे. तर उर्वरित बारच्या कागदपत्रांची व बांधकामाची स्थळ पाहणी करण्याचे आदेश प्रभाग स्तरीय कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी दुपारपासून ही कारवाई सुरु करण्यात आली. यात सुरुवातीला ‘टाईमलेस’ हॉटेलवर कारवाई करुन हा बार भू-सपाट करण्यात आला. तर पुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपयुक्त रवी पवार यांनी दिली आहे.

आणखी वाचा-तरुणीने AI चा वापर करत काढला मुलाचा आवाज, मैत्रिणीची केली फसवणूक

डान्स बारची पुन्हा उभारणी, आमदार सरनाईक थंड

मिरा भाईंदर शहरातील अनधिकृत डान्सबार विरोधात आमदार प्रताप सरनाईक यांनी वारंवार आवाज उठवल्यानंतर २०२२ मध्ये शहरातील ४५ बार पैकी जवळ पास १३ हून अधिक डान्स बारवर पालिकेने कारवाई केली होती. परंतु कालांतराने हा विषय थंडावला. परिणामी कारवाई झालेल्या बार पैकी काही ठिकाणी पुन्हा बांधकाम झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. या बारसंदर्भात सरनाईकांचा विरोध अचानक थंडावल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.