८९ मॅट्रिक टन  साठा उपलब्ध

वसई : करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान प्राणवायू (ऑक्सिजन) मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली होती. तशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पालिका आधीच सतर्क राहिली आहे. वसई-विरार महापालिकेकडे प्राणवायूचा ८९ मॅट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून सद्य:स्थितीत हा साठा पुरेसा आहे. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका वसई-विरार शहराला बसला होता. दुसऱ्या लाटेत शहरात मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. यातील करोनामुळे गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना उपचारांदरम्यान प्राणवायूची गरज भासत होती. यामुळे विविध ठिकाणाहून प्राणवायू मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक झाली होती. वसई-विरार शहरात दुसऱ्या लाटेत प्रतिदिन २५ मॅट्रिक  टन प्राणवायूची गरज भासत होती.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
Rahul Gandhi Helicopter
हेलिकॉप्टरचे इंधन संपल्यामुळे राहुल गांधींवर शहडोलमध्येच रात्र काढण्याची वेळ, प्रशासनाची धावपळ
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया

हीच परिस्थिती लक्षात घेता तिसऱ्या करोनालाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने ही पालिकांना सोयी सुविधांच्या संदर्भात सज्ज राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच अनुषंगाने वसई विरार महापालिकेने चंदनसार, बोळिंज, सोपारा, वसई वरुण इंडस्ट्री अशा ठिकाणी प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत पालिकेकडे ८९  मॅट्रिक टन इतका प्राणवायूचा साठा उपलब्ध आहे. याआधीच्या लागणाऱ्या प्राणवायूच्या साठय़ापेक्षा तीन पटीहून अधिकचा साठा पालिकेकडे उपलब्ध झाला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूची जास्त गरज भासली होती त्याच अनुषंगाने आता पालिकेने उपाययोजना केल्या असून करोना उपचार केंद्र येथे प्राणवायू प्रकल्प सुरू केले आहेत. त्यामुळे रुग्णांना गरज पडल्यास पुरेसा प्राणवायू उपलब्ध करून देता येईल.

– डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी महापालिका