विरार : पालघर जिल्ह्यात शिक्षकांचे पगार आणि भविष्य निर्वाह निधी देणारे कार्यालय असूनही जिल्ह्यातील शाळा या कार्यालयाला जोडल्या नसल्याने पगारासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठाणे कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. शासनाने दोन वर्षांपूर्वी या कार्यालयाला मंजुरी देऊनही अजून कारभार सुरूच झालेला नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व अनुदानित-विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना पगार, वेतन निश्चिती  आणि भविष्य निर्वाह निधीसाठी ठाणे कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला. त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील विविध महत्त्वाची आस्थापने पालघर जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आली. परंतु आज आठ र्वष उलटून गेल्यावरही त्यांची घडी बसलेली नाही. या गोंधळात नागरिकांची परवड होते आहे. वेतन आणि भविष्य निधी निर्वाह पथकाचे कार्यालय दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले. अधीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली, परंतु पालघर जिल्ह्यातील शाळा या कार्यालयाशी जोडल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळ सर्व अनुदानित-विनाअनुदानित शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निधी अजूनही पालघर जिल्ह्याला वर्ग केला जात नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतनाची बिले ठाण्याला जमा करावी लागतात. ही प्रक्रिया त्रासदायक असल्याने पगार वेळेवर निघत नाहीत. त्याचबरोबर वेतननिश्चिती पडताळणी पथकही अजून पालघर जिल्ह्यात कार्यान्वित केलेले नाही. त्यामुळे सेवेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनंत अडचणी येतात. शिक्षक सेवेत आल्यानंतर ३ वर्षांनी वेतन निश्चिती करावी लागते. यानंतर ८ वर्षांनी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि २४ वर्षांनी निवड श्रेणी अशा पद्धतीने पगार निश्चिती होते. हे पथकही पालघर जिल्ह्यात कार्यरत नसल्याने शिक्षकांच्या श्रेणी रखडल्या आहेत.  

Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
voting centers in pune will be manage by college students
मतदान केंद्रांचा कारभार पुण्यातील युवक-युवतींकडे… होणार काय?

वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाची गरज 

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय आणि स्वतंत्र विद्यापीठ यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन निश्चिती आणि भविष्य निर्वाह निधी यासंदर्भातील सर्व कामे या पथकामार्फत केली जातात.

अनेक वेळा मागणी करूनही हे कार्यालय सुरू झालेले नाही. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा फार त्रास होतो आहे. पगारासंबंधित अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हे कार्यालय सुरू करावे.

– प्रकाश वर्तक, अध्यक्ष, शिक्षक शिक्षकेतर संघटना पालघर