वसई-विरार पालिकेच्या आरोग्य विभागात ७६ नव्या डॉक्टरांची नियुक्ती

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पालिकेने आरोग्य विभागात ७६ नव्या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.

मनुष्यबळ ९०० वर, मासिक खर्च तीन कोटींवर

वसई: करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पालिकेने आरोग्य विभागात ७६ नव्या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.  त्यामुळे  डॉक्टरांची संख्या १४२ वरून  २१८ एवढी झालीआहे.  मनुष्यबळ आता ९०५ एवढे झाले आहे. या सर्वांवर मासिक वेतनासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च होत आहे.

पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अतिशय भयानक होती. ती रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली होती. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने आरोग्य विभागात डॉक्टरांपासून विविध पदाची भरती सुरू केली. सध्या पालिकेच्या   ९०५ मनुष्यबळात २१८ डॉक्टर्स, ५ सार्वजनिक आरोग्य परिचारिका, २६३ अधिपरिचारिका (जीएनएम), २३६ प्रसविका (एएनएम), ७१ फार्मासिस्ट, ८४ प्रयोगशाळा सहाय्यक, १९ क्ष किरण सहाय्यक यांचा समावेश आहे. याशिवाय शीतसाखळी तज्ज्ञ, डायलेसिस पर्यवेक्षक आदी विविध पदांचा समावेश आहे.

तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता  आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागात भरती करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष देहरकर यांनी दिली. पालिकेचे नवे करोना उपचार केंद्र, करोना बाल रुग्णालय, लसीकरण मोहीम यासाठी या नवीन भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  महापालिकेचे २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, वसई येथील सर डी एम पेटीट रुग्णालय आणि नालासोपारा येथील तुळींज रुग्णालय आणि दोन माता बालसंगोपन केंद्रे आहे.    करोनासाठी चंदनसार रुग्णालय, वरुण इंडस्ट्री करोना केंद्रे, अग्रवाल केंद्र तयार केले आहे.  रुग्ण वाढत असल्यान पालिकेने एप्रिल महिन्यात आरोग्य विभागात अधिकाअधिक डॉक्टर्स आणि परिचारिकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या दृष्टीने थेट मुलाखती घेऊन ही पदे भरण्यात आली.

पालिका सध्या एमबीबीएस डॉक्टरांना ७५ हजार, बीएएमएस डॉक्टरांना ५० हजार आणि बीएचएमएस डॉक्टरांना ४० हजार एवढे मासिक वेतन देते. नवीन भरती होणार्?या डॉक्टर्स आणि परिचारिकांना देखील याच वेतनश्रेणीत वेतन दिले जाणार आहे. नव्याने भरती होणार्?या डॉक्टर्स आणि इतर कर्मचार्?यांना ११ महिन्याच्या करारावर सेवेत समावून घेण्यात आले आहे. हा करार नियमित वाढवला जाणार आहे.

सध्या करोनाचे संकट लक्षात घेऊन आरोग्य विभाग अधिक बळकट करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने आम्ही ही भरती केली आहे. पालिकेच्या विविध विभागात, करोना केंद्रात तसेच लसीकरण मोहीमेत या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे

संतोष देहरकर— अतिरिक्त आयुक्त, वसई विरार महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Appointment 76 new doctors health department vasai virar municipality ssh

Next Story
औद्योगिक वसाहतीत घाणीचे साम्राज्य
ताज्या बातम्या