वसई: विवेक ग्रामीण विकास संस्थेतर्फे ग्रामीण भागात बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेतर्फे बांबूपासून कलाकृती करणाऱ्या ६० कलाकारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ग्रामस्तरावरील उपलब्ध संसाधनातून आर्थिक विकास साधण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बांबू उद्योग असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
वसई पूर्वेच्या भालिवली येथे या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदूस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, खासदार राजेंद्र गावित, दिलीप करंबेळकर, प्रदीप गुप्ता, आमदार राजेश पाटील, राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित अध्यक्ष, वसई विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार, अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ तसेच अभिनेता मनोज जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक नरेंद्र पितळे आदी उपस्थित होते.