विरार : नालासोपारा पूर्व येथे अनधिकृत गाळय़ांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या संदर्भात पोलीस तुिळज पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
वसई-विरार महानगरपालिका प्रभाग समिती बी च्या वतीने नालासोपारा पूर्व महेश पार्क परिसरातील काही अनधिकृत गाळय़ांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास गेलेल्या पथकावर चाळ माफियांनी दगडफेक करण्याचा डाव आखला होता.
पालिका पथक दाखल झाल्यावर ३०० ते ४०० लोकांच्या समूहाने पालिकेच्या पथकाला घेराव घातला. त्याच्या हाती दगड असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. जमावाकडून धोका निर्माण होत असल्याचे दिसताच पालिका कर्मचारी यांनी पोलिसांना फोन करून बोलावले तुळिंज पोलीस तत्काळ घटना स्थळी फौजफाटा घेऊन पोहचली असता. जमावाला पांगवायला सुरुवात केली आणि दुर्घटना टाळली. यानंतर पालिकेने कोणतीही कारवाई न करता आपला पसारा घेऊन निघाले. यासंदर्भात पालिकेने अथवा पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही.