वसई : जन्मत: पाय वाकडे असलेल्या एका बाळाला दोन वर्षांनंतर पालिकेच्या डॉक्टरांनी उपचार करून पाय सऱळ केले. हा चिमुकला आता स्वत:च्या पायावर चालू लागला आहे. दोन वर्षांनी पाय सरळ होण्याची ही दुर्मीळ घटना आहे.

विरारमध्ये राहणाऱ्या बनसोडे दाम्पत्याला मयूर नावाचा मुलगा आहे. करोनाकाळात त्याचा जन्म झाला होता. पण जन्मत: बाळाचे पाय वाकडे होते. आर्थिक परिस्थिती बेताची आणि करोनाकाळात उपचारासाठी बाहेर पडता येत नव्हते. बाळाचे पाय वाकडे असल्याने बनसोडे दाम्पत्याचा जीव तीळ तीळ तुटत होता. रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांच्याकडे हे प्रकरण आले. त्यांनी वसई-विरार महापालिकेच्या सर डी. एम. पेटीट रुग्णालयाचे हाड़ांचे डॉक्ट़र आल्हाद राऊत यांच्याकडे मुलाला नेले. डॉ. राऊत यांनी मुलाला तपासले. दोन वर्षांचा काळ निघून गेला होता. त्यामुळे मुलावर पोन्सटी पद्धतीने श्रेणीबद्ध प्लास्टर करून पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. डॉ. राऊत यांनी पोन्सटी पद्धतीने बाळाच्या पायावर प्लास्टर केले. पाच महिने ही उपचार पद्धती सुरू होती. शस्त्रक्रियेची गरज लागू शकणार होती. वसईच्या जनसेवा रुग्णालयाच्या शैलेंद्र ठाकूर यांनी ती मदत देऊ केली. उपचार पद्धतीला यश आले आणि शस्त्रक्रियेविनाच चिमुकला चालू लागला.

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत

पोन्सटी पद्धतीने पाय सरळ केल्यानंतर त्याला विशेष बूट घालावे लागतात.  क्युअर क्लबफूट महाराष्ट्र या संस्थेचा पालिका रुग्णालयाबरोबर करार आहे. ही संस्था विनामूल्य शूज उपलब्ध करून देते. संस्थेने मयूरलादेखील हे विशेष बूट उपलब्ध करून दिले. मुंबईच्या हाजीअली येथील एसआरसीसी रुग्णालयात छोटी प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि आता मयूर आपल्या पायावर चालू लागला आहे.

असा प्रकार एक हजार मुलांमध्ये आढळतो. वेळीच उपचार केल्याने ते बरे होतात. परंतु दोन वर्षांनंतर बाळाचे पाय सरळ होणे ही दुर्मीळ घटना आहे. आमच्या प्रयत्नांना यश आले आणि आता हा चिमुकला पूर्ण बरा झाला असून तो चालू लागला आहे, अशी माहिती डॉ. आल्हाद राऊत यांनी दिली.

पोन्सटी पद्धती प्लास्टरची जी पद्धत अवलंबली जाते. त्यास ponseti casting म्हणतात.  यामध्ये दर आठवडय़ातून एकदा प्लास्टर बदलले जाते.  साधारणत: ४-५ वेळा प्लास्टर बदलावे लागते. शेवटच्या प्लास्टरच्या वेळी एका छोटय़ा शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. हे बिनटाक्याचे ऑपरेशन असून यात कसलाही रक्तस्राव होत नाही. पाय पूर्णपणे सरळ झाल्यानंतर प्लास्टर काढून विशिष्ट प्रकारचे बूट (splint) वापरण्यासाठी दिले जातात.   शस्त्रक्रियेमध्ये कडक असलेले स्नायू सैल केले जातात व सरकलेली हाडे पूर्ववत जागेवर आणली जातात.