वसई : जन्मत: पाय वाकडे असलेल्या एका बाळाला दोन वर्षांनंतर पालिकेच्या डॉक्टरांनी उपचार करून पाय सऱळ केले. हा चिमुकला आता स्वत:च्या पायावर चालू लागला आहे. दोन वर्षांनी पाय सरळ होण्याची ही दुर्मीळ घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरारमध्ये राहणाऱ्या बनसोडे दाम्पत्याला मयूर नावाचा मुलगा आहे. करोनाकाळात त्याचा जन्म झाला होता. पण जन्मत: बाळाचे पाय वाकडे होते. आर्थिक परिस्थिती बेताची आणि करोनाकाळात उपचारासाठी बाहेर पडता येत नव्हते. बाळाचे पाय वाकडे असल्याने बनसोडे दाम्पत्याचा जीव तीळ तीळ तुटत होता. रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांच्याकडे हे प्रकरण आले. त्यांनी वसई-विरार महापालिकेच्या सर डी. एम. पेटीट रुग्णालयाचे हाड़ांचे डॉक्ट़र आल्हाद राऊत यांच्याकडे मुलाला नेले. डॉ. राऊत यांनी मुलाला तपासले. दोन वर्षांचा काळ निघून गेला होता. त्यामुळे मुलावर पोन्सटी पद्धतीने श्रेणीबद्ध प्लास्टर करून पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. डॉ. राऊत यांनी पोन्सटी पद्धतीने बाळाच्या पायावर प्लास्टर केले. पाच महिने ही उपचार पद्धती सुरू होती. शस्त्रक्रियेची गरज लागू शकणार होती. वसईच्या जनसेवा रुग्णालयाच्या शैलेंद्र ठाकूर यांनी ती मदत देऊ केली. उपचार पद्धतीला यश आले आणि शस्त्रक्रियेविनाच चिमुकला चालू लागला.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby born with bow legs successfully treated by vasai virar municipal doctor zws
First published on: 11-05-2023 at 10:12 IST