scorecardresearch

बारबालेचा बंदुकीच्या जोरावर ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न

फसलेल्या लुटीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. ही महिला बारबाला असून मिरा रोड येथील एका बार मध्ये काम करते.

वसई: एका बारबालेने  नकली बंदुकीच्या आधारे विरार मधील एक ज्वेलर्स दुकान लुटण्यचा प्रयत्न केला. मात्र सराफाने प्रसंगावधान दाखवून या महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे देवनारायण हे ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळावारी दुपारी एक बुरखाधारी महिला या दुकानात खरेदीसाठी आली होती. त्यावेळी देवलाल गुजर हे दुकानात एकटे होते. दोन तास ती महिला लग्नासाठी दागिने बघत होती. दुपारी अचाकन एकच्या सुमारास तिने लपवून आणलेली बंदूक काढली आणि त्याला धमकावत दागिने आणि रोख रक्कम देण्याची मागणी केली. मात्र गुजर यांनी प्रसंगावधान दाखवत या महिलेला पकडले. त्यानंतर तिला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. फसलेल्या लुटीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. ही महिला बारबाला असून मिरा रोड येथील एका बार मध्ये काम करते. तिच्या विरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने आणलेली नकली बंदूक सिगारेट लायटर होती. तिची पार्श्वभूमी आम्ही तपासत आहोत, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bar girl attempt to rob in jewellery shop at gunpoint in virar zws

ताज्या बातम्या