मीरा-भाईंदर शहराच्या सौंदर्याला बहर

एखादे चांगले ठिकाण दिसले की आपसूकच हातातील मोबाइलने सेल्फी काढला जातो.

शहराच्या विविध भागांत आकर्षक ‘सेल्फी पॉइंट्स’ची निर्मिती

वसई : एखादे चांगले ठिकाण दिसले की आपसूकच हातातील मोबाइलने सेल्फी काढला जातो. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांनादेखील या सेल्फीचा मोह आवरत नाही. जिथे सेल्फी काढायची तो परिसर सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक असणे गरजेचे असते. लोकांची सेल्फीची गरज आणि शहर आकर्षक बनविण्याचा भाग म्हणून मीरा-भाईंदर महापालिकेने शहरात ठिकठिकाणी १७ ‘सेल्फी पॉइंट्स’ विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेने शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. नुकतेच महापालिकेने ‘स्वच्छतेची दिवाळी’ हा उपक्रम राबवून शहरातील प्रमुख ठिकाणे दिव्यांच्या रोषणाईने उजळून टाकली होती. आता स्वच्छ आणि सुंदर शहराचा उपक्रम म्हणून शहरात ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येत आहे. मीरा-भाईंदर हे शहर नव्या आणि जुन्या शहरांचा  संगम आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणे निवडून ती सेल्फी पॉइंट म्हणून विकसित करण्यात येत आहेत. आकर्षक सजावट, नयनरम्य देखावे तयार करून त्यावर रोषणाई केली जाणार आहे. प्रामुख्याने या पॉइंटवर त्या ठिकाणाच्या नावासह ‘आय लव’ हे वाक्य जोडण्यात आले आहे. यात गोल्डन नेस्ट, इंद्रलोक, जेसल पार्क चौपाटी, नवघर आदी ठिकाणांचा समावेश आहे.

याबाबत माहिती देताना पालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी सेल्फीचा आविष्कार झाल्यानंतर मुंबईत सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला. त्या ठिकाणी नागरिकांची छायाचित्रे काढण्यासाठी गर्दी होऊ लागली. या सेल्फी पॉइंटमुळे शहराचे चांगले चित्र तयार होणार आहे. शहरातील प्रमुख नाके, ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहतील आणि त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मीरा-भाईंदर शहरात र्पयटनापासून विविध कामांसाठी बाहेरून लोक येत असतात. त्यांच्यासाठी हे सेल्फी पॉइंट आकर्षणाचा केंद्र ठरतील.

एक कोटी ७६ लाख खर्च

मीरा-भाईंदर शहरात १७ विविध ठिकाणी हे १७ सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी ७६ लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. ही कामे नगरसेवक निधीतून केली जाणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी दिली. पालिकेच्या सेल्फी पॉइंटचे तरुण वर्गाकडून मोठे स्वागत करण्यात येत आहे.

सेल्फी पॉइंटमुळे शहराची आकर्षक आणि सुंदर प्रतिमा तयार होण्यास मदत होणार आहे. शहराच्या विविध भागांत हे सेल्फी पॉइंटस तयार करण्यात येत आहेत

अजित मुठे, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beauty mira bhayandar city blossom ysh

Next Story
रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती
ताज्या बातम्या