विरार मध्ये फरसाणच्या दुकानात स्फ़ोट ; एक जण जखमी ; स्फ़ोटाचे  कारण अस्पष्ट

सदरची घटना रात्री ११.३० च्या सुमारास घडल्याने दुकानदार दुकान बंद करून घरी गेला होता.

विरार मध्ये फरसाणच्या दुकानात स्फ़ोट ; एक जण जखमी ; स्फ़ोटाचे  कारण अस्पष्ट
फरसाणच्या दुकानात शनिवारी रात्री अचानक मोठा आवाज होऊन स्फ़ोट झाला

विरार – विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरात एका फरसाणच्या दुकानात शनिवारी रात्री अचानक मोठा आवाज होऊन स्फ़ोट झाला आणि दुकानाचे शटर उडून रस्त्यावरील पदाचाऱ्याला लागण्याने तो जखमी झाला. त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. स्फ़ोट इतका भीषण होता की दुकानातील सर्व सामान आणि काचेच्या वस्तूंची नासधूस झाली.तर इतर भांडी सुद्धा फुटली होती.

सदरची घटना रात्री ११.३० च्या सुमारास घडल्याने दुकानदार दुकान बंद करून घरी गेला होता. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच वसई विरार महानगरपालिका अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दुकानात कोणत्याही प्रकरची आग लागली नव्हती अथवा  विजेच्या तारांचे शॉक सर्किट झाल्याचेही आढळून आले नाही.

दुकानात पाच गॅसचे सिलेंडर होते पाचही सिलेंडर साबूत होते. त्यातही कुठली गळती आढळून आली नाही. अग्निशमन दलाने हे सर्व सिलेंडर सावधानीने बाहेर काढले. यामुळे नेमका हा स्फ़ोट कशाने आणि कसा झाला याची कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही. स्फ़ोटचे कारण स्पष्ट न यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विरार : ‘ओएनजीसी’ने सांगितले सुमद्रात दिसणाऱ्या ‘त्या’ आगीचे नेमके कारण, म्हटले की…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी
9 Photos