वसई:- प्रभाग समिती नवीन कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला आहे. या गोंधळानंतर ही शुक्रवारी सायंकाळी महापौरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला तर वाद निर्माण होऊ नये म्हणून महापालिका अधिकाऱ्यांनी उदघाटन स्थळी जाणे टाळले.

विरार पश्चिम येथे प्रभाग समिती अ बोळींज चे नवीन कार्यालया उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा हा १३ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आलेल्या पत्रिकेत आमदार, खासदार यांची नावे वगळण्यात आली असून एकप्रकारे राजशिष्टाचाराचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. मात्र या कार्यक्रमाचे महापालिकेकडून केले नसल्याचे व निमंत्रण पत्रिका ही पालिकेने छापल्या नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही शुक्रवारी भाजपने महापालिकेच्या मुख्यालयात निमंत्रण पत्रिकेच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनाला धारेवर धरत जोरदार ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलना दरम्यान राज शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई शिस्त भंगाची कारवाई करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते मनोज पाटील व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. निमंत्रण पत्रिकेच्या वादानंतर पुन्हा भाजप आणि बविआ पुन्हा एकदा आमने- सामने आल्याची चर्चा ही राजकिय वर्तुळात रंगली होती. तर दुसरीकडे निमंत्रण पत्रिकेच्या ठरलेल्या नियोजनानुसार या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडतो किंवा नाही याकडे सुद्धा अनेकांचे लक्ष लागले होते.

या वादाच्या पार्श्वभूमीवर बोळींज प्रभाग समिती कार्यालयाचे उद्घघाटन शुक्रवारी सायंकाळी पार पडले. या कार्यक्रमाला भाजपाने बहिष्कार घातला होता तर वाद नको म्हणून पालिकेचे अधिकारीही गैरहजर राहिले. महापौर अजीव पाटील आणि माजी आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी महापौर मार्शल लोपीस, सभागृह नेता प्रफुल्ल साने व बविआचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यालयाच्या उदघाटना दरम्यान प्रतिक्रिया देताना उपमहापौर मार्शल लोपीस यांनी सांगितले की अशा कार्यक्रमांना सर्वांनी एकत्र यायला हवे होते.ही तयार झालेली वास्तू आहे ती लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी हा सोहळा आयोजित केला होता असेही त्यांनी सांगितले. निमंत्रण पत्रिकेबाबत निर्माण झालेल्या ही त्यांनी भाष्य करताना सांगितले की खुद्द भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनात आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे नाव वगळले होते. तेव्हाही भाजपने त्यांचा कार्यक्रम केला होता असे त्यांनी सांगितले.