scorecardresearch

वसईच्या बौद्ध स्तुपावर त्रिगुणी बुद्धपौर्णिमा उत्साहात साजरी

सोमवारी सोपारा येथील अडीच हजार वर्षे जुन्या पुरातन बौद्धb स्तुपात विशाखा पौर्णिमा अर्थात त्रिगुणी बुद्धपौर्णिमा मोठय़ा उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.

श्रामणेर शिबीर, महापरित्राण पाठ, धम्म देसना कार्यक्रमांचे आयोजन
वसई: सोमवारी सोपारा येथील अडीच हजार वर्षे जुन्या पुरातन बौद्धb स्तुपात विशाखा पौर्णिमा अर्थात त्रिगुणी बुद्धपौर्णिमा मोठय़ा उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या वेळी श्रामणेर शिबीर, महापरित्राण पाठ, धम्म देसना आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी वसई विरार शहरात सर्वत्र बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या दिवशी झाल्याने ही पौर्णिमा त्रिगुणी जयंती म्हणून साजरी करण्यात येते. सौपारा येथील बौद्ध स्तुपावर मागील २५ वर्षांपासून हा जंयंतीउस्तव साजरा करम्ण्यात येतो. वैशाख पौर्णिमेनिमित्त सोपारा येथील बुद्ध स्तुपावर तीन दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करम्ण्यात आले होते. शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या पाली भाषा विभागातर्फे एकदिवसीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करम्ण्यात आले होते. रविवारी माताजी भिख्खूणी संघमित्रा थेरी आणि भंते नागसेन यांच्याक उपस्थितीत महापरित्राण पाठ पठण करण्यात आले. सोमवारी पौर्णिमेच्या दिवशी बुद्धरूप ते बुद्धस्तूप परिसरात भव्य धम्म मिरवणूक काढण्यात आली होती. स्तुपावर धम्म देसना आणि बुद्धपूजा पाठचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बौद्धधम्मीय उपासक आणि उपासिका मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वैशाख पौर्णिमेचे महत्त्व
गौतम बुद्धांच्या जीवनात जन्म, बुद्धत्व प्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्यामुळे या पौर्णिेमेला त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात. सिद्धार्थ गौतमाचा महामाया व शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला होता. वयाच्या ३५व्या वर्षी निरंजना नदीच्या काठी दु:ख मुक्तीचे ज्ञान प्राप्त झाले आणि तो सम्यक संबुद्ध झाला. याच दिवशी गौतमाला चार आर्यसत्याची अनुभूती झाली. याच पौर्णिमेच्या दिवशी ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी गौतम बुद्धांचे मल्ल गणराज्याची राजधानी कुशिनारा येथील शाल वाटिकेत महापरिनिर्वाण झाले.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Buddhapournima buddhist stupa vasai organizing shramner shibir mahaparitran path dhamma desana programs amy