scorecardresearch

भाईंदर : गुजराती नागरिकांना प्राधान्य देणारी गृह संकुलाची ‘ती’ जाहिरात मागे, विकासकाने मागितली माफी

मीरा रोड येथील एका विकासकाने देखील केवळ मारवाडी व गुजराती नागरिकांना प्राधान्य देत असल्याची जाहिरात समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली होती.

builder withdrawn advertisement give priority gujarati citizens
गुजराती नागरिकांना प्राधान्य देणारी जाहिरात

मीरा रोड येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतीत मारवाडी व गुजराती नागरिकांना प्राधान्य देणार असल्याची जाहिरात करणाऱ्या ‘त्या’ गृह निर्माण गृहनिर्माण संस्थेने  अखेर आपली जाहिरात मागे घेतली आहे. याबाबत मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विकासकाने माफी मागितली आहे.

हेही वाचा >>> माजी स्थायी समिती सभापतीकडे मागितली १ कोटींची खंडणी;विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

contract recruitment
‘‘मुलींनो कंत्राटी भरतीच्या विरोधात रस्त्यावर उतरा, अन्यथा तुम्हाला…’’, समाज माध्यमांवर वेगळीच चर्चा
land for Mhada houses
‘म्हाडा’च्या घरांसाठी मिळणार ७० हेक्टर जमीन, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात आहेत जमिनी
Sudhir Chaudhary
सुधीर चौधरी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाचा अंशत: दिलासा
conduct counseling camps in schools to prevent sexual harassment dombivli mahila mahasangh
लैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठी शाळांमध्ये समुपदेशन शिबिर घ्या; डोंबिवली महिला महासंघाची साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे मागणी

मराठी नागरिकांना घर नाकरण्यात येत असल्याचा मुद्दा राज्यभर गाजत असताना मीरा रोड येथील एका विकासकाने देखील केवळ मारवाडी व गुजराती नागरिकांना प्राधान्य देत असल्याची जाहिरात समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली होती. यामुळे खळबळ उडाली होती. महाराष्ट्रात मराठी नागरिकांना घर देण्यास नकार देणाऱ्या विकासाबद्दल  मीरा भाईंदर मनसे नेते संदीप कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे या संदर्भात नमती भूमिका घेत गृहनिर्माण  संस्थेने ही जाहिरात मागे घेत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या नावे  लेखी माफी नामा लिहुन दिला आहे. या प्रकल्पाशी आमदार गीता जैन यांचे नाव जोडण्यात आले होते. याबाबत  त्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Builder withdrawn advertisement give priority gujarati citizens after mns aggressive stand in mira road zws

First published on: 03-10-2023 at 20:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×