scorecardresearch

बंगल्यातील तरण तलावात पडून चिमुकलीचा मृत्यू

उत्तन येथील एका खासगी बंगल्यातील तरण तलावात पडून सहा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

प्रतिनिधिक छायाचित्र

भाईंदर :- उत्तन येथील एका खासगी बंगल्यातील तरण तलावात पडून सहा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुंबईतील बँकेचे काही कर्मचारी या बंगल्यात सहलीला आले होते.

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे असलेल्या रिसॉर्ट आणि खासगी बंगल्यात अनेक जण सहलीसाठी येत असतात. शुक्रवारी सकाळी दहिसर येथील आयसीआयसीबँक मध्ये काम करणारे अठरा कर्मचारी आपल्या कुटुंबासह बंगला क्रमांक-२५ येथे सहलीला आले होते सकाळी  सर्व जण नाष्टा करण्यासाठी पहिल्या मजल्यावर गेले होते. यावेळी दोन लहान मुले तरणतलावाजवळ खेळत होते. साडेदहाच्या सुमारास जितिका नारकणी  ही सहा वर्षाची मुलगी तरणतलावात पडली. ती पडलाचे बघताच तिचे कुटुंबीय मदतीसाठी धावले. तिला तात्काळ पाण्यातून बाहेर काढले. मात्र ती बेशुद्ध पडली होती. तिला  मिरा रोड येथील वोखार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला असल्याचे उपचार  करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.या संदर्भात अपमृत्यूची  नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती उत्तन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी दिली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Child dies falling pool bungalow resort trip ysh

ताज्या बातम्या