वसई : करोनच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून असलेल्या बंधनातून मुक्ती मिळाल्याने यंदा नाताळ मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. नाताळाच्या ख्रिस्त आगमनाच्या काळाला सुरुवात झाली असून रविवार, २७ नोव्हेंबरला वसईतील सर्व चर्चेसमध्ये पहिली जांभळय़ा रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली.

२५ डिसेंबरला होणाऱ्या नाताळ सणाच्या आधी महिनाभर आधी आगमन काळ सुरू होतो. त्यासाठी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश ख्रिस्त मंदिरांतून दिला जातो. त्यानंतर २४ डिसेंबरच्या मध्यरात्री येशूजन्माच्या वेळी पांढऱ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जातो. या आगमनकाळाला सुरुवात झाली आहे. रविवारी वसईच्या विविध चर्चेसमध्ये जांभळी मेणबत्ती पेटविण्यात आली. ख्रिस्ती श्रद्धेनुसार जांभळा रंग हा आशेचा रंग असून प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर येत आहे, ही आशा या मेणबत्तीच्या प्रज्वलनाने जागवली जात असते. येशूजन्माच्या सातशे वर्षे आधी यशया या संदेष्टय़ाने येशूच्या जन्माचे भाकीत करून तत्कालीन लोकांना पापमुक्ती आणि तारणाची आशा दिली होती. त्याचेही प्रतीक म्हणून जांभळय़ा रंगाची मेणबत्ती प्रज्वलित केली जाते.

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

यंदा नाताळ सण उत्साहात आणि निर्बंधमुक्त

करोनामुळे दोन वर्षांंपासून नाताळ सण मुक्तपणे साजरा करता आला नव्हता. यंदा मात्र कसलेही बंधन नसल्याने चर्चमध्ये सामूहिक मिस्सा (प्रार्थना) होणार आहेत. खऱ्या अर्थाने नाताळ आनंददायी वातावरणात साजरा होणार आहे. कॅरल सिंगिंग, कार्निवल आणि इतर धार्मिक कार्यRम यंदा वसईत साजरे केले जाणार आहे, अशी माहिती मॉन्सेनियअर फादर फ्रान्सिस कोरिया यांनी दिली.

मेरी ख्रिसमसच्या ऐवजी हॅप्पी ख्रिसमस का म्हणत नाहीत? स्वतः राणी एलिझाबेथने सांगितलं होतं ‘हे’ मोठं कारण

आगमन काळ आणि मेणबत्तीचे महत्त्व

कॅथोलिक चर्चचे उपासना वर्ष हे आगमन काळाच्या पहिल्या रविवारी सुरू होते. २५ डिसेंबरपूर्वी येणारे चार रविवार हे आगमन काळातील पहिला, दुसरा, तिसरा व चौथा रविवार अशा नावांनी ओळखले जातात. आगमन काळातील पहिल्या भागात ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या पुनरागमनाची तयारी करण्यासाठी भाविकांना आवाहन करते. दुसऱ्या भागात १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर या दरम्यान ख्रिस्तसभा येशूच्या पहिल्या येण्याची स्मृती साजरी म्हणजेच ख्रिसमसची तयारी करते. आगमन काळातील चार रविवारी वर्तुळाकार रिथवर प्रत्येक रविवारी एक या क्रमाने चार मेणबत्त्या प्रज्वलित करण्याची प्रथा आहे. त्या मेणबत्त्या अनुक्रमे विश्वास, आशा, पश्चात्ताप आणि आज्ञाधारकपणा यांच्या जीवनाची प्रतीके मानली जातात.