वसईत ठिकठिकाणी संविधान दिन साजरा

संविधान दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन शिबीर, कार्यकर्ता परिषद, संविधान गौरव दिन अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून मोठय़ा उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.

lifestyle

वसई :  संविधान दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन शिबीर, कार्यकर्ता परिषद, संविधान गौरव दिन अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून मोठय़ा उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.

संत गोन्सालो गार्सिया कॉलेजमधील प्रा. गुणवंत गडबडे यांनी विद्यार्थ्यांना घटनेच्या उद्देशिकेमध्ये भारतीय राज्यघटनेतील सर्व मूल्य प्रतिबिंबित होतात. ती मूल्ये प्रत्येकाने आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. श्रमजीवी संघटनेने यानिमित्त कार्यकर्ता परिषद घेत विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच सर्वधर्मीय संविधान बचाव समिती यांच्यातर्फे वायएमसीए मैदान, माणिकपूर येथे संविधान गौरव दिन या समारंभ साजरा करण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Constitution day celebrated vasai ysh

ताज्या बातम्या