भाईंदर : शारीरिक तंदुरूस्ती आणि इंधनाच्या बचतीसाठी मीरा-भाईंदर महापालिकेने शहरात सायकल मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर मीरा रोड येथे ७० लाख रुपये खर्चून एक किलोमीटर लांबीची सायकल मार्गिका (ट्रॅक) तयार केली जाणार आहे.

वाहने, औद्य्ोगिकीकरण यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. दुसरीकडे इंधन देखील मोठय़ा प्रमाणावर खर्च होत असते. यासाठी पालिकेने नागरिकांना सायकलच्या वापरण्याचे आवान केले आहे. सायकलीलांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने सायकल मार्गिका विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर मीरा रोड येथील जे.पी.इन्फ्रा या मार्गांवर ‘सायकल ट्रक’ ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.पंधराव्या वित्त आयोगातुन पालिकेला ३१ कोटी रुपये  वर्ग करण्यात आला आहे. या निधीचा वापर पालिका विविध उपRम राबवण्याकरिता करत आहे. या निधीतून ७० लाख रुपये या मार्गिकेसाठी खर्च केले जाणार आहेत.

Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

साधारण एक किलोमीटर लांब हा मार्ग असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या मार्गाची रचना ही केवळ सायकल चालवण्याकरिता होईल, अशी त्याची निर्मिती केली जाणार आहे. या संदर्भातील निधी आणि प्रस्ताव उद्यन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला असून लवकरच या मार्गिकेची निर्मिती होणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.