वसई: करोनाचे र्निबध शिथिल झाल्यानंतर वसई-विरार शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शहराच्या विविध भागांत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी शिस्तबद्ध वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.
करोना र्निबध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांनंतर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. यानिमित्ताने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करम्ण्यात आले होते. प्रबोधनात्मक कार्यक्रम, व्याख्याने, रक्तदान शिबिरे, रोजगार मेळावे, विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
वसईच्या सिद्धार्थ जागृती संघातर्फे बौद्ध विहारात जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. विरार, वसई, नालासोपारा या भागांतील स्थानिक मंडळांतर्फे आणि राजकीय पक्षांतर्फे महामानवाला अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करम्ण्यात आले होते. तसेच संध्याकाळी रस्त्यावर मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शांततेत आणि नियमांचे पालन करून पार पडली. त्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
वालीवच्या जयभीम नगर येथे आंबेडकरी काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात प्रा. आत्माराम गोडबोले, कवी प्रकाश पाटील, पिराजी जाधव, प्रांजली काळबेंडे, सखाराम डाखोरे यांनी भाग घेतला. वसईच्या वर्तक महाविद्यालयात अभिवादन सभा, ग्रंथप्रदर्शन आणि मुक्त वाचनकटय़ाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणात सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टीन यांनी भारतीय संविधानाची आणि संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, करुणा आणि सहिष्णुता या मूल्यांच्या आधारे घटनेचे मर्म विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरिवद उबाळे यांनी भारतीय समाजात खोलवर रुजलेली जातीयता समूळ नष्ट करण्याची गरज स्पष्ट केली.

solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?