वसई : वसई पूर्वेच्या नवजीवन येथे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून डंपर साडेतीनशे फूट खोल दरीत कोसळून अपघात घडला आहे. यात चालक व सोबत असलेल्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. समद शेख (२४) व नरेश पवार (१४) अशी मृतांची नावे आहेत.

बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वसई पूर्वेच्या नवजीवन येथील खदाणीत दगडांची वाहतूक करण्यासाठी चालक समद शेख हा निघाला होता. याच दरम्यान याच परिसरात राहणारा नरेश हा मुलगासुद्धा त्याच्यासोबत गेला होता. यावेळी वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि डंपर थेट साडेतीनशे फूट खोल असलेल्या खदाणीत कोसळला. यात चालक समद व सोबत असलेला मुलगा नरेश याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

mystery, suicide, Mehta, father,
मेहता पिता पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ कायम, कर्जबाजारी नसल्याचा सुनेचा दावा
Vasai Key Seller, Vasai Key Seller Assault, Human Rights Commission Orders, Human Rights Commission Orders Police to Pay Rs 3 Lakh Compensation, Officer Suspended, vasai news, marathi news,
वसई : चावी विक्रेत्याला ३ लाखांची नुकसान भरपाई, राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश
bva chief hitendra thakur struggling to maintain his existence in assembly elections in palghar district
ठाकूरशाहीला बोईसरमध्येही हादरा?
fire, slipper , factory,
वसईच्या चिंचोटी येथे चप्पल तयार करणाऱ्या  कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू
Malegaon, daughters, died,
वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुलींसह तिघांचा अपघातात मृत्यू
former ranji cricket player suresh devbhakt passed away
वसई : रणजीपटू सुरेश देवभक्त यांचे निधन
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

हेही वाचा – वसई : चावी विक्रेत्याला ३ लाखांची नुकसान भरपाई, राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश

हेही वाचा – मेहता पिता पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ कायम, कर्जबाजारी नसल्याचा सुनेचा दावा

या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालविल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेले दोघेही नवजीवन येथे राहणारे आहेत. मुलागा नरेश पवार हा जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सातवीत शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.