वसई: वसई पश्चिमेच्या भुईगाव परिसरात शासकीय जागेतील तलावात माती भराव टाकून तलाव बुजवून अतिक्रमण करण्यात येऊ लागले आहे. याप्रकरणी भूमाफिया यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
वसई पश्चिमेच्या भागात भुईगाव खुर्द परिसर आहे. या भागात सव्र्हे Rमांक १४९ अ व ब या लोकल बोर्डाच्या काळात शासकीय जागेत तलाव तयार करण्यात आला होता. ग्रीन गार्डन नर्सरीच्या जवळ हा तलाव आहे. मात्र या तलावात सध्या भूमाफियांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. या तलावात मातीभराव टाकून हा तलाव बुजविण्यात येत असून येथील शासकीय जागा गिळंकृत करण्याचा प्रय सुरू केला आहे. तर दुसरीकडे या कामासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहचविली जात आहे. या बेकायदेशीर माती भरावामुळे पावसाचे पाणी निचरा होण्यास अडथळे निर्माण होणार आहेत याचा फटकायेथील शेतकरम्य़ांना बसण्यासाठी शक्यता असल्याचे मी वसईकर अभियानाचे मिलिंद खानोलकर यांनी सांगितले आहे. या प्रकाराकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केले असल्याने दिवसेंदिवस येथील अतिक्रमण वाढू लागले आहे. यासाठी महसूल विभागाने या भागात लक्ष देऊन तलावात टाकण्यात आलेला माती भराव काढून टाकून तलाव पूर्ववत करण्यात यावे व ज्यांनी अतिRमण केले त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी खानोलकर यांनी वसईच्या तहसिलदार विभागाकडे केली आहे.
