वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाड फाटा येथे गुन्हे शाखा २ च्या पथकाने एका वाहनातून १ कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून एका आरोपील ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून एका वाहनातून बनावट नोटा आणण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा २ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने विरार येथील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड फाटा येथे सापळा लावून एक संशयित चार चाकी वाहन ताब्यात घेतले.
त्या वाहनांची तपासणी केली असता. एका बॅॅगेत या नकली नोटा ठेवलेल्या होत्या. पोलिसांनी ५०० रुपयांच्या एकूण २० हजार नोटा जप्त केल्या आहेत. त्या एकूण १ कोटींच्या नोटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकऱणी स्थानिक रहिवाशी प्रदीप पाटील याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नकली नोटा नेमक्या कशासाठी आणल्या होत्या आणि त्यांची छपाई कुठे कऱण्यात आली त्याचा पोलीस तपास करत आहेत.
